Sunday, December 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडदेशातील सुज्ञ नागरिक भाजप बरोबर - महापौर उषा ढोरे

देशातील सुज्ञ नागरिक भाजप बरोबर – महापौर उषा ढोरे

Job Ad Banner
Advt.

नौकरी ढूंढ रहे हो।

यहां देखे

Visit our website mahajoblive.in

पिंपरी चिंचवड : पंजाब वगळता उत्तरप्रदेश, गोवा, मणिपूर आणि उत्तराखंडमधील विधानसभा निवडणुकीत भाजप ला पुन्हा एकदा सत्ता मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ यांच्या नेतृवावर लोकांनी विश्वास दाखवला आहे. देशातील नागरिक पुन्हा एकदा भाजपासोबत आहेत, हे सिद्ध झाले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपची पुन्हा सत्ता येईल, असा विश्वास महापौर उषा ढोरे यांनी व्यक्त केला.

पिंपरी-चिंचवड भारतीय जनता पार्टीच्या वतीने पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आनंदोत्सव साजरा करण्यात आला. कार्यकर्त्यांनी मध्यवर्ती कार्यालयासमोर एकत्र येवून एकमेकांना पेढे वाटून अभिनंदनही केले.

आम आदमी पार्टीचा पिंपरीत जल्लोष, देशात आम आदमी पार्टी प्रमुख विरोधी पक्ष – चेतन बेंद्रे

यावेळी नगरनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, प्रदेश सचिव अमित गोरखे, स्थायी समिती सभापती नितीन लांडगे, नगरसेविका अनुराधा गोरखे, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, राजू दुर्गे, विजय फुगे, रवी जांभुलकर आदी उपस्थित होते.

उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपुर या पाच राज्यांतील चित्र आता जवळपास स्पष्ट होत आहे. पाच राज्यांपैकी ४ राज्यात भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. गोवा राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. त्यामुळे आगामी काळात भाजपा पूर्ण बहूमत मिळवून भाजपा पुन्हा एकदा शहराच्या विकासासाठी सज्ज होईल, असा विश्वासही महापौर ढोरे यांनी व्यक्त केला.

तलाठ्यांनो सावधान ! ..अन्यथा घरभाडे बंद करणार

विशेष लेख : गडचिरोली जिल्ह्यामधील पर्यटन विकासाचा अभाव


संबंधित लेख

लोकप्रिय