Monday, June 24, 2024
Homeताज्या बातम्या10th Result कधी लागणार ? शालेय शिक्षण मंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती

10th Result कधी लागणार ? शालेय शिक्षण मंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती

10th Result : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (MSBSHSE) बारावीचा निकाल (HSC Result) 21 मे रोजी जाहीर करण्यात आला. आता दहावीचा निकाल कधी लागणार याकडे 10 वीच्या परिक्षा दिलेल्या विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागलेले आहे. अशात आता दहावीच्या निकालाबद्दल अत्यंत मोठे अपडेट समोर आले आहे. (10th Result)

राज्यात दहावीची परीक्षा 1 मार्च ते 26 मार्च 2024 यादरम्यान पार पडली. यंदा 16 लाख 9 हजार 444 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली. बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता दहावीच्या या निकालाकडे सर्वांच्या नजरा आहेत. दहावीचा निकाल कधी जाहीर होणार याबद्दल विद्यार्थ्यांकडून विचारणा केली जात असताना मेच्या चाैथ्या आठवड्यात दहावीचा निकाल लागण्याची शक्यता व्यक्त जात आहे.

राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. बारावीचे विद्यार्थी चांगल्या गुणानं उत्तीर्ण झाले त्यांचं अभिनंदन करतो, असं दीपक केसरकर म्हणाले. त्यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दहावीचा निकाल देखील 27 मे पर्यंत लागेल अशी माहिती दिली आहे.

दरम्यान, दीपक केसरकर यांनी दोन दिवसांपूर्वीच निकाल जाहीर होणार होता.मात्र, राज्यात पाचव्या टप्प्याचं मतदानं होणं बाकी होतं. त्यामुळं राज्यातील मतदान पार पडल्यानंतर निकाल जाहीर करण्यात आला असं केसरकर यांनी सांगितले.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : महाराष्ट्रातील मुलींना मोफत उच्च शिक्षण मिळणार

सध्या चर्चेत असलेल्या पोर्शे कारची किंमत किती? जाणून घ्या!

बस ड्रायव्हर, ट्रक ड्रायव्हर यांना निबंध का लिहिण्यास सांगितला जात नाही पुण्यातील अपघातावर राहुल गांधी यांची प्रतिक्रिया

‘देवाला बनवले पंतप्रधान मोदींचे भक्त’ भाजप नेते संबित पात्रा यांचे वादग्रस्त विधान

कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी भाजप नेते ब्रिजभूषण सिंग यांची न्यायालयात महत्वाची माहिती

मोठी बातमी : पुणे अपघात प्रकरणी विशाल अग्रवालला अटक, वाचा अपघातातील धक्कादायक बाबी

ब्रेकिंग : आज १२ वीचा निकाल, इथे पहा निकाल !

राज्यात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे सरासरी ५४.३३ टक्के मतदान

अलिशान कारच्या धडकेत दोघांचा मृत्यू ; निबंध लिहिण्यासह इतर अटी टाकत 15 तासांत जामीन मंजूर

धक्कादायक : एकाच तरूणाने केले ८ वेळा मतदान, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

पुणे केंब्रिज ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट अंतर्गत भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय