Tuesday, September 17, 2024
Homeताज्या बातम्याWeather update : राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट, शाळांना सुट्टी तर नागरिकांना...

Weather update : राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट, शाळांना सुट्टी तर नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन

Weather update : जुलै महिना सुरू झाल्यापासून राज्यातील विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. विशेषतः कोकणात अति मुसळधार पावसामुळे अनेक लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाने आज, 15 जुलै 2024 रोजी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. (Weather update)

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज कोकणासह मुंबई आणि इतर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकणातील काही भागांना रेड अलर्ट जारी करण्यात आले आहे. रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यांना अति मुसळधार पावसाचा इशारा दिला असून, प्रशासनाला सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या भागातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे आणि नागरिकांना महत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे सांगण्यात आले आहे. (Weather update)

मुंबई, पुणे, पालघर, ठाणे या जिल्ह्यांमध्ये देखील मुसळधार पावसाची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईत गेल्या आठवड्यापासून सतत पाऊस पडत असून, अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. त्यामुळे नागरिकांना वाहन चालवताना त्रास सहन करावा लागत आहे.

आज मुंबई कोकण तसेच पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांमध्ये देखील चांगला पाऊस पडणार आहे. सांगली, धाराशिव, सोलापूर, लातूर, जळगाव, धुळे, नंदुरबार, औरंगाबाद, जालना, नांदेड या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस पडणार आहे.

Weather update

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : अमेरिकेचे माजी राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर प्रचारसभेदरम्यान गोळीबार

धक्कादायक : अंगणवाडीत शाळेत पोषण आहारात आढळले बेडक

निवासी आदिवासी आश्रमशाळांची वेळेबाबत आदिवासी विकास मंत्री काय म्हणाले पहा !

दूध अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार

धक्कादायक : बागेतील आंबे खाल्ल्याने अल्पवयीन मुलांना झाडाला बांधून मारहाण

पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेतून विद्यार्थ्यांना मिळणार रुपये 60,000 पर्यंत लाभ

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना मिळणार 60,000 रूपये

संबंधित लेख

लोकप्रिय