Sunday, December 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडरिक्षा चालकांचे प्रश्न प्रलंबित ठेऊन निवडणुकीस समोर गेल्यास गाठ आमच्याशी - कष्टकऱ्यांचे...

रिक्षा चालकांचे प्रश्न प्रलंबित ठेऊन निवडणुकीस समोर गेल्यास गाठ आमच्याशी – कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे

लोणावळा येथे रिक्षा चालक मालकांचा स्नेह मेळावा संपन्न

लोणावळा : टू व्हीलर बाइक बंद करण्यात यावी, वाढीव दंड कमी करण्यात यावी, रिक्षा चालक मालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करावे, या सह रिक्षाचालक मालकांचे विविध प्रश्न सरकार दरबारी प्रलंबित आहेत, हे प्रश्न प्रलंबित ठेवून प्रस्थापित राजकिय पक्ष निवडणुकीस समोर जात आहेत. महाराष्ट्रात लवकरच 20 महानगरपालिकेत व नगरपालिकेत  निवडणुका होणार आहेत, महाराष्ट्रात वीस लाख रिक्षा चालक मालक आहेत. शहरी भागात रिक्षाचालकांची संख्या मोठी आहे, यामुळे रिक्षा चालकांचे  प्रश्न प्रलंबित ठेवून निवडणुकीस समोरे गेल्यास गाठ आमच्याशी आहे हे लक्षात ठेवा. तातडीने रिक्षाचालक मालकांचे प्रश्न सोडवा अन्यथा प्रस्थापित पक्षा विरोधात वेगळा निर्णय घेऊ असा इशारा महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी दिला आहे.

लोणावळा येथे महाराष्ट्र रिक्षा पंचायत लोणावळा शहर वतीने रिक्षाचालक मालकांचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला यावेळी ते बोलत होते. यावेळी शिक्षण मंडळाचे माजी सभापती व पंचायत प्रदेश उपाध्यक्ष बाबूभाई शेख, जितूभाई टेलर, संजय अडसुळ मधुराताई डांगे, अब्बास शेख आदी उपस्थित होते. यावेळी रिक्षाचालक सभासदांना ओळखपत्र व रिक्षाला लावल्यास स्टिकरचे वाटप करण्यात आले.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, नाशिक येथे विविध पदांसाठी भरती, 25,000 रूपये पगाराची नोकरी

इंधनाच्या वाढत्या दरावरून मोदींनी राज्य सरकारांना सुनावलं, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले प्रत्युत्तर

यावेळी बाबा कांबळे म्हणाले, महाराष्ट्र रिक्षा पंचायत वतीने पिंपरी-चिंचवड शहरात रिक्षाचालकांना घरकुल मिळवून दिले. सीएनजी किट अनुदान मिळवून दिले, सीएनजी फिलिंग सेंटर साठी प्रयत्न केले असे  असंख्य प्रश्न सोडवले. यामुळे महाराष्ट्रात सर्वात मोठी संघटना म्हणून अपल्या संघटनेचा उदय होत आहे, महाराष्ट्रात सहा जिल्ह्यात कार्यालय व प्रत्येक जिल्ह्यात संघटनांचे कार्य सुरू आहे. लोणावळा शहरात ओला उबेर बंद केले, मिटर कॅलिब्रेशन चे प्रश्न सोडवले पंचायत वतीने केलेल्या कामामुळे संघटनेवर तुम्ही विश्वास टाकला, मोठया प्रमाणावर सभासद झालात. तुमच्या विश्वासाला तडा जाणार नाही, अधिक जोमाने आम्ही काम करू, असे बाबा कांबळे म्हणाले.

कार्यक्रमाच्या संयोजनासाठी महाराष्ट्र रिक्षा पंचायत लोणावळा शहर अध्यक्ष आनंद सदावर्ते, विनय बच्चे, भगवान घनवट, विकास खेंगरे, भाऊ शिवेकर, चंद्रकांत बालगुडे, रवींद्र ताकधुंदे, वसीम खान, संजय डेंगळे, सत्तार शेख यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे प्रस्ताविक आनंद सदावर्ते यांनी केले सूत्रसंचालन बापू तारे यांनी केले आभार बाबू भाई शेख यांनी मानले.

– क्रांतिकुमार कडुलकर

गॅस, पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ माकपची सांगलीत निदर्शने

पुणे मनपासमोरील हिरवळीवर जाण्यास नागरिकांना मनाई करणारे आदेश मागे घ्यावेत : विजय कुंभार

संबंधित लेख

लोकप्रिय