Saturday, October 5, 2024
Homeग्रामीणबोरघर ग्रामस्थांतर्फे विविध व्यक्तींचा सत्कार, तर वाचनालयाचे उद्घाटन

बोरघर ग्रामस्थांतर्फे विविध व्यक्तींचा सत्कार, तर वाचनालयाचे उद्घाटन

घोडेगाव : आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागातील बोरघर या गावामध्ये सुमारे 650 नोकरदार  व व्यावसायिक वर्गाने एकत्र मिळून काळभैरवनाथ ग्रामविकास संघ व बोरघर ग्रामस्थांतर्फे गावचे नाव उज्वल करणाऱ्या सामाजिक राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे अधिकारी, डॉक्टर, सेवानिवृत्त शासकीय कर्मचारी व विद्यार्थी यांचा मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

त्याचबरोबर बोरघर गावात वाचनालयाचे व बचत गट कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले. एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी बळवंतराव गायकवाड यांच्या हस्ते उदघाटन झाले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. दिलीप बांबळे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून घोडेगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राहुल जोशी, डॉ.संतोष सुपे, डॉ.प्रमिला बांबळे, संजय शेळके, उपसभापती कृषि उत्पन्न बाजार समिती, सरपंच सीताबाई बांबळे, किसनराव खामकर, राजू नंदकर उपजिल्हाधिकारी मुंबई, राजू घोडे, ग्रामसेवक जितेंद्र वाकडे, उपसरपंच दादू उंडे हे उपस्थित होते.

शिक्षक संवर्गातील 200 बिंदू नामावली रद्द करा, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षची मागणी

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे विविध मागण्यांचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

यावेळी गावातील नोकरदार, पेन्शनर, व्यावसायिक यांच्या प्रयत्नातून गोरगरीब, वाडीवस्तीतील रुग्णांसाठी एकमताने गावासाठी रुग्णवाहिका लवकरच गावात कार्यरत करू असे काळभैरवनाथ ग्रामविकास संघाचे अध्यक्ष राजू वाळकोली यांनी सांगितले‌. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय जंगले यांनी केले तर सूत्रसंचालन राजू नंदकर यांनी केले.

बोरघर ग्रामस्थांनी सण २०२०-२०२१ आणि सन २०२१-२०२२ या कालावधीत उत्कृष्ट काम करून आपल्या बोरघर गावचे नाव राज्य आणि देश पातळीवर झळकावले आशा मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

पाच किलो सफरचंद आणि 15 लिटर दुध पिणारा रेडा

यामध्ये सर्वोच्च न्यायालय येथे अनुसूचित जमाती विद्यार्थ्यांना न्याय मिळणेसाठी याचिका दाखल केली तिची दखल विधानसभा अधिवेशनात घेण्यात आली असे डॉ.दिलीप विठ्ठल बांबळे, बँक ऑफ महाराष्ट्र च्या सहाय्यक महा प्रबंधक (Assistant General Manager) या पदावर पदोन्नतीने झालेले संदीप चंद्रकांत पोटे, कोव्हीड काळात कामकाज आणि रुग्णांना आधार दिला असे डॉ.धीरज गोविंदराव जंगले, डॉ.प्रदीप प्रकाश दगडे, डॉ. हरीश किसन खामकर, पोलिस निरीक्षक म्हणून पदोन्नती जल झालेले रवींद्र सूर्याजी बांबळे, पोलिस उपनिरीक्षक म्हणून पदोन्नती रमेश सिताराम घोडे, उत्पादन शुल्क विभागात अधिकारी पदावर महाराष्ट्र राज्य सेवा परिक्षेतुन निवड वर्षा रमेश घोडे तसेच कोवीड काळामध्ये चांगले काम केल्याबद्दल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलेल्या डॉ. सरिता दत्तात्रय बांबळे यांचा सत्कार करण्यात आला.

पुणे मनपासमोरील हिरवळीवर जाण्यास नागरिकांना मनाई करणारे आदेश मागे घ्यावेत : विजय कुंभार

संबंधित लेख

लोकप्रिय