Saturday, November 9, 2024
Homeताज्या बातम्याHeavy rain : राज्यात मुसळधार पाऊसाचा इशारा, तर काही जिल्ह्यांना रेड अलर्ट

Heavy rain : राज्यात मुसळधार पाऊसाचा इशारा, तर काही जिल्ह्यांना रेड अलर्ट

मुंबई : हवामान विभागाने आज राज्यात अतिवृष्टीचा इशारा दिला असून, मुंबईसह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा (Heavy rain) इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी गरज नसल्यास घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोकणातील रायगड, रत्नागिरी, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यांना रेड अलर्ट (Heavy rain) जारी करण्यात आला आहे. तसेच, मुंबई, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नाशिक, कोल्हापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आणि धुळे, नंदुरबार, जळगाव, संभाजीनगर, जालना, परभणीसह विदर्भातील सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

धरणांचा जलसाठा वाढला, विसर्ग सुरू

पुणे जिल्ह्यातील खडकवासला, पवना, मुळशी आणि चासकमान धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्याने धरणे भरली आहेत. त्यामुळे या धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि परिसरातील नद्यांच्या पूररेषेलगतच्या भागात आणि कोयना धरणातूनही मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे.

नागरिकांची सुरक्षा महत्त्वाची (Heavy rain)

राज्य सरकारने कृष्णाकाठच्या गावातील, पूररेषेलगत आणि सखल भागातील नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घेण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. या भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

कोलकाता विमानतळ बनले तलाव; बंगाल मध्ये तुफान पाऊस, व्हिडिओ व्हायरल

बीएएमएस पदवीधारक विद्यार्थ्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय

दहावी उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी; 3000+ जागांसाठी भरती

पुण्यातील निळ्या पूररेषेतील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा आराखडा तातडीने तयार करण्याचे निर्देश

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

ब्रेकिंग : जुन्नर येथील इंगळून घाटात दरड कोसळली, या गावांचा संपर्क तुटला

मोठी बातमी : संसदेतील ‘त्या’ भाषणानंतर राहुल गांधींवर ईडीची छापेमारी होणार ?

Jio, Airtel चे टेन्शन वाढले ; TATA आणि BSNL मध्ये मोठा करार

ब्रेकिंग : माझी लाडकी बहीण योजने संदर्भात नवीन माहिती समोर

मोठी भरती : भारतीय टपाल विभागात 44228 पदांची भरती; पात्रता 10वी पास

संबंधित लेख

लोकप्रिय