Thursday, April 24, 2025
---Advertisement---
---Advertisement---

मोठी बातमी : घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत मोठी वाढ, सर्वसामान्यांना झटका

मुंबई : देशातील सर्वसामान्य नागरिकांना आज पुन्हा एकदा महागाईचा झटका बसला आहे. केंद्र सरकारने घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत 50 रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ आजपासूनच लागू झाली असून, याचा थेट परिणाम कोट्यवधी कुटुंबांच्या बजेटवर होणार आहे. (LPG Gas Price hiked) केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी आज दिल्लीत ही घोषणा केली.

---Advertisement---

LPG price hiked | गॅस सिलिंडरच्या किंमतीत 50 रुपयांची वाढ

इंडियन ऑईलच्या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आलेल्या माहितीनुसार 8 एप्रिलपासून सामान्य ग्राहकांसाठी 14.2 किलोच्या गॅस सिलिंडरची कोलकाता इथं गॅस सिलेंडरचे दर 879 रुपयांवर पोहोचले आहेत. तर, मुंबईत हेच दर 852.90 रुपये आणि चेन्नईमध्ये दर 868.50 रुपयांवर पोहोचले आहेत. तर प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सबसिडी असलेल्या सिलिंडरची किंमत 500 रुपयांवरून 550 रुपये झाली आहे.  (हेही वाचा – नाशिकमध्ये पत्नी पीडित पुरुषांचा मेळावा, पुरुष आयोगाची केली मागणी)

केंद्र सरकारने ही दरवाढ आंतरराष्ट्रीय बाजारातील गॅसच्या किंमतींमध्ये झालेल्या चढ-उतारांशी जोडली आहे. हरदीप सिंग पुरी यांनी सांगितले की, “ही वाढ उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसह सर्व ग्राहकांसाठी लागू असेल. दर 15 ते 30 दिवसांनी या किंमतींचा आढावा घेतला जाईल.” त्यांनी पुढे स्पष्ट केले की, जागतिक बाजारातील अस्थिरता आणि इंधनाच्या किंमतींवरील दबावामुळे हा निर्णय घ्यावा लागला आहे. तथापि, या कारणावरून विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. (हेही वाचा – महानगरपालिकेच्या आयुक्तांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली, वाचा काय आहे प्रकरण !)

---Advertisement---

सर्वसामान्यांवर परिणाम

ही दरवाढ विशेषतः मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबांसाठी मोठा धक्का मानली जात आहे. गेल्या काही वर्षांत पेट्रोल, डिझेल आणि आता गॅसच्या किंमतीत सातत्याने वाढ होत असल्याने घरगुती खर्चाचा बोजा वाढत चालला आहे. आधीच बाजारात भाज्या आणि इतर जीवनावश्यक वस्तू महाग झाल्या असताना आता गॅसच्या किंमती वाढल्याने सामान्यांचे बजेट कोलमडणार आहे. (हेही वाचा – धक्कादायक : पुण्यात शरीराचे पाच तुकडे करून खाणीत फेकला मृतदेह)

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles