Friday, November 22, 2024
Homeताज्या बातम्याVHA : मतदारांनो…. मोबाईल ॲप व ऑनलाईन माध्यमातून काढा मतदार चिठ्ठी

VHA : मतदारांनो…. मोबाईल ॲप व ऑनलाईन माध्यमातून काढा मतदार चिठ्ठी

VHA : लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची तारीख जवळ येत असून ठाणे जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मतदान करावे, यासाठी जिल्हा प्रशासन जोमाने काम करत आहे. मतदारांना मतदान करताना सोईचे जावे, यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) तसेच शासकीय कर्मचाऱ्यांमार्फत मतदार चिठ्ठ्यांचे वाटप करण्यात येत आहे. त्याचबरोबर मतदारांना त्यांच्या मतदार यादीतील नावांची माहिती व्हावी, यासाठी भारत निवडणूक आयोगाने मोबाईल ॲप व ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेचा लाभ घेऊन मतदारांनी आपली मतदार चिठ्ठी डाऊनलोड करावी आणि आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे. (VHA)

ठाणे जिल्ह्यात 23 भिवंडी, 24 आणि 25 ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी येत्या 20 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. ठाणे जिल्ह्याचा मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा स्वीपच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जनजागृती करत आहे. तसेच प्रत्येक लोकसभा मतदारसंघनिहाय असलेल्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयामार्फत मतदारांना घरोघरी जाऊन मतदार चिठ्ठ्यांचे वाटप करण्यात येत आहे.

मतदारांना त्यांच्या मतदान क्रमांक, मतदान केंद्र, मतदार यादीतील भाग व अनुक्रमांक याची माहिती घरबसल्या मिळविण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने व्होटर हेल्पलाईन अँप आणि https://voters.eci.gov.in/https://electoralsearch.eci.gov.in/ या दोन वेबसाईटवर सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या माध्यमातून मतदारांना आपल्या मतदार यादीतील नाव व इतर माहिती घेता येईल तसेच मतदार चिठ्ठी सुद्धा डाऊनलोड करता येईल. या मतदार चिठ्ठीची प्रिंट आऊट घेऊन मतदानासाठी जाता येणार आहे. या मतदार चिठ्ठीसोबत भारत निवडणूक आयोगाने मान्य केलेली 12 पैकी एक ओळखपत्र मतदानासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत. (VHA)

व्होटर हेल्पलाईन ॲप (Voter Helpline App -VHA) – या ॲपलिकेशन द्वारे नागरिकांना मतदार यादीतील मतदाराचे नाव शोधणे, मतदार नोंदणीचे अर्ज दाखल करणे, मतदान केंद्रांची माहिती इत्यादी सुविधा उपलब्ध आहे.

खालील पायऱ्या फॉलो करून व्होटर हेल्पलाइन मोबाइल ॲपद्वारे व्होटर स्लिप डाउनलोड करू शकता :

पायरी 1: गुगल प्ले स्टोअर (Google Play Store) वरून ‘व्होटर हेल्पलाइन ॲप’ डाउनलोड करावे.

पायरी 2: मतदार सेवा पोर्टल (https://voters.eci.gov.in/ ) या संकेतस्थळावर नोंदणी केली असल्यास तेथे नोंदणीकृत तुमचा मोबाइल नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा किंवा तुम्ही मतदार सेवा वेबसाइटवर नोंदणीकृत नसाल तर ‘नवीन वापरकर्ता’ म्हणून नोंदणी करा आणि ॲपमध्ये लॉग इन करा.

पायरी 3: ‘मतदार यादीत आपले नाव शोधा’ या पर्यायावर क्लिक करा.

पायरी 4: पर्यायांपैकी कोणताही एक निवडा – ‘मोबाइलद्वारे शोधा’, ‘बार/क्यूआर कोडद्वारे शोधा’, ‘तपशीलांनुसार शोधा’ किंवा ‘EPIC क्रमांकाद्वारे शोधा’.

पायरी 5: आवश्यक माहिती समाविष्ट करा आणि ‘शोध’ वर क्लिक करा.

पायरी 6: मतदारांचे तपशील दिसेल. त्या ठिकाणच्या ‘डाउनलोड’ आयकॉनवर क्लिक करा.

वेबपोर्टलवरून ऑनलाईन मतदार चिठ्ठी (व्होटर स्लिप) अशी करा डाउनलोड

भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरूनही आपल्याला मतदार चिठ्ठी डाऊनलोड करता येणार आहे. त्यासाठी खालील प्रमाणे स्टेप फॉलो करा.

पायरी 1: भारत निवडणूक आयोगाच्या अधिकृत https://voters.eci.gov.in/https://electoralsearch.eci.gov.in/ वेबसाइटवर लॉग इन करा.

पायरी 2: मुख्यपृष्ठावरील ‘मतदार यादीत शोधा’ (Search in Electoral Roll) टॅबवर क्लिक करा.

पायरी 3: सोबतच्या पर्यायांपैकी कोणताही एक निवडा – ‘तपशीलांनुसार शोधा’, ‘EPIC द्वारे शोधा’ किंवा ‘मोबाईलद्वारे शोधा’.

पायरी 4: आवश्यक माहिती आणि कॅप्चा कोड टाका करा आणि ‘शोध’ वर क्लिक करा.

पायरी 5: समोर तुमचे मतदार विवरण दिसेल. तुम्ही तुमचे तपशील बरोबर आहेत का ते तपासू शकता.

पायरी 6: मतदार तपशीलाच्या खालील बाजूस ‘मतदार माहिती छापा’ (प्रिंट व्होटर इन्फॉर्मेशन) बटणावर क्लिक करा.

डाऊनलोड झालेली मतदार माहितीची प्रिंट काढून आपल्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान करता येणार आहे.

भारत निवडणूक आयोगाने मतदारांना त्यांची नावे ऑनलाइन मतदार यादीमध्ये शोधण्यासाठी सोयी उपलब्ध करून दिले आहेत. या दोन्ही माध्यमातून तुम्ही तुमचा मतदार ओळखपत्र तपशील सहजपणे पाहू शकता. यामध्ये नाव, पत्ता, लोकसभा मतदारसंघाचे नाव, विधानसभा मतदारसंघाचे नाव व क्रमांक, मतदान केंद्राचा पत्ता, मतदार यादीमधील भाग क्रमांक व नाव आणि भाग मतदाता क्रमांक याची माहिती नमूद असते. प्रत्येकाला ऑनलाईन माध्यमातून ही मतदार स्लिप डाउनलोड करता येईल.

ठाणे जिल्ह्यातील सजग मतदारांनी आपले मतदार चिठ्ठी घेऊन येत्या 20 मे 2024 रोजी मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

Newsclick संपादक प्रबीर पुरकायस्थ यांची अटक बेकायदेशीर, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

खासदार नवनीत राणा यांच्या घरी चोरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एकूण किती संपत्ती, आकडेवारी एकूण व्हाल थक्क

मोठी बातमी : नारायणगावात महादेव बेटिंग ऍप प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, 70 ते 80 जण ताब्यात

ब्रेकिंग : खर्च नोंदवही तपासणीसाठी सादर न केल्यामुळे दोन उमेदवारांवर गुन्हे दाखल

मोठी बातमी : विधानपरिषद शिक्षक, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका पुढे ढकलल्या

Ghatkopar hoarding tragedy: मृतांचा आकडा वाढला; 16 जणांचा मृत्यू

Tourism : उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरायला जा, दक्षिण भारतात

नॅशनल ब्युरो ऑफ प्लांट जेनेटिक रिसोर्सेस अंतर्गत भरती

संबंधित लेख

लोकप्रिय