Monday, December 23, 2024
Homeजिल्हाज्येष्ठ साहित्यिक नरेंद्र लांजेवार यांचे निधन, पार्थिवाचे होणार देहदान !

ज्येष्ठ साहित्यिक नरेंद्र लांजेवार यांचे निधन, पार्थिवाचे होणार देहदान !

बुलढाणा : जिल्ह्यातील भारत विद्यालयाचे ग्रंथपाल आणि ज्येष्ठ साहित्यिक नरेंद्र लांजेवार यांचे निधन झाले आहे. लद्धड रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 54 वर्षांचे होते. गेल्या अनेक दिवसांपासून ते फुफ्फुसाच्या आजाराने त्रस्त होते. त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे देहदान करण्यात आले.

विशेष लेख : व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने एक पत्र प्रेमाला…

नरेंद्र लांजेवार यांचा जन्म 11 मे 1968 रोजी झाला होता. ते भारत विद्यालयामध्ये ग्रंथपाल असताना त्यांचा साहित्य व काव्य चळवळीशी सक्रिय संबंध होता. अनेक नवोदित लेखकांना त्यांनी साहित्याचे पीठ उपलब्ध करून दिले. 

पोलीस उपनिरिक्षक होण्याची सुवर्णसंधी एमपीएससी तर्फे 250 जागा

विदर्भ साहित्य संघाचे ते आजीवन सदस्य होते. बुलडाणा येथे त्यांनी बालसाहित्य संमेलन, महिला साहित्य संमेलन, युवा साहित्य संमेलन अशी विविध साहित्य संमेलने घेतली आहेत. ‘मुक्त पत्रकार’ म्हणून त्यांचे पत्रकारितेच्या क्षेत्रातही काम राहिले आहे.

अमरावती : DYFI जिल्हा अध्यक्षपदी प्रा. प्रशांत कोकणे तर जिल्हा सचिवपदी किशोर शिंदे

संबंधित लेख

लोकप्रिय