Vasant more : पुण्यात एका श्रीमंताने दोन दुचाकीस्वारांना त्याच्या पोर्श कारने चिरडले. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. हे प्रकरण सध्या चांगलेच तापले आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांचे आरोप प्रत्यारोप देखील सुरू आहे. (Pune accident) अशात आता वंचित बहुजन आघाडीचे पुणे लोकसभेचे उमेदवार वसंत मोरे (Vasant more) यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
वसंत मोरे यांनी सोशल मीडियावर लिहले आहे की, कोरेगाव पार्क मध्ये जो अपघात झाला तो दुर्दैवीच होता, पण त्यामागून जे राजकारण चालू दिसतंय त्यामध्ये आपल्या पुण्याच्या काही नेत्यांची कीव येते. नाईट लाईफ काय फक्त कोरेगाव पार्क मध्येच आहे का ? ज्यांनी पुढाकार घेऊन कारवाया लावल्या त्या कोथरूड मधील पुढाऱ्यांनी जरा आपल्या भागातील नाईट लाईफ विषयी लक्ष द्यावे असा टोला काँग्रेसचे आमदार आणि पुणे लोकसभेचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांना लगावला आहे.
पुणे मोरे यांनी म्हटले आहे की, भुगाव, पिरंगुट या भागाकडे म्हणजेच मुळशी कडेही लक्ष द्यावे. तसेच ज्यांनी निवेदन दिली त्यांनी सुद्धा एन आय बी एम कोंढवा भागाकडे सुद्धा लक्ष द्यावे. नाहीतर असं म्हणावं लागेल कोरेगाव पार्कमध्ये जाणारी तरुण पिढी दारू पिण्यासाठी जाते आणि वरील भागांमध्ये नाईट लाईफसाठी जाणारी तरुण पिढी नारळाचे पाणी पिण्यासाठी जाते का ? कोणकोणत्या नेत्याचे कुठे कुठे नाईट लाईफ मध्ये लागेबांधे आहेत भविष्यात जर त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर जागेवर जाऊन लाईव्ह केले जातील.
Vasant more यांनी दिला इशारा
तसेच, पोलीस यंत्रणेने फक्त कोरेगाव पार्क टारगेट न करता संपूर्ण पुणे शहर सुद्धा टार्गेट करावे. अन्यथा वंचित बहुजन आघाडी म्हणून जर कुठे हिंसक आंदोलन झाली तर त्याला संपूर्णपणे जबाबदार ही भ्रष्ट यंत्रणा असेल अशा इशारा वसंत मोरे यांनी दिला आहे.


हेही वाचा :
काँग्रेस आमदार पी. एन. पाटील यांचे निधन
Pune : पुणे येथे नोकरीची संधी; आजच करा ऑफलाईन अर्ज!
मोठी बातमी : MDH आणि Everest मसाल्यांबाबत FSSAI च्या रिपोर्टमध्ये नवीन खुलासा
ब्रेकिग : 10 वीच्या निकाल कधी लागणार ?, शालेय शिक्षण मंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती
मोठी बातमी : 2010 पासूनचे 5 लाख ओबीसी प्रमाणपत्र रद्द, हायकोर्टाचा निर्णय
इयत्ता १२ वी परीक्षेच्या निकालानंतर बोर्डाचा मोठा निर्णय
मोठी बातमी : महाराष्ट्रातील मुलींना मोफत उच्च शिक्षण मिळणार
सध्या चर्चेत असलेल्या पोर्शे कारची किंमत किती? जाणून घ्या!
‘देवाला बनवले पंतप्रधान मोदींचे भक्त’ भाजप नेते संबित पात्रा यांचे वादग्रस्त विधान
कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी भाजप नेते ब्रिजभूषण सिंग यांची न्यायालयात महत्वाची माहिती
मोठी बातमी : पुणे अपघात प्रकरणी विशाल अग्रवालला अटक, वाचा अपघातातील धक्कादायक बाबी