Sunday, June 16, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : कचरा वेचकांच्या मुलींचे बारावीत उज्वल यश

PCMC : कचरा वेचकांच्या मुलींचे बारावीत उज्वल यश

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : कचरावेचक (स्वच्छता कर्मचारी) शकुंतलादेवी यांची कन्या करीना जयस्वाल हिचा संत गाडगेबाबा जागृती मंचच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याच सोहळ्यात सुप्रिया दासरे हीचाही सन्मान करण्यात आला. (pcmc)

आकुर्डीतील गोदावरी विद्यालयातील विद्यार्थिनी करीना जयस्वाल हिने इयत्ता बारावीला ८६.८७ टक्के गुण मिळवून विशेषण प्राविण्य मिळविले करीनाची आई शकुंतलादेवी ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात (pcmc) कचरा वेचक म्हणजे आरोग्य सेवकाचे काम करतात. पती लालबहादूर यांचा २०११ साली मृत्यू झाल्यानंतर सुद्धा त्यांनी मुलांच्या शिक्षणासाठी मागे हटले नाही. दिवसभर कष्ट करत मुलांच्या शिक्षणासाठी प्रयत्न केले आणि मुलींनी त्यांचे स्वप्न साकार केले, सत्कार समारंभाच्या वेळी शकुंतला देवी यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू तरळत होते. (pcmc)

करीना हिने झोपडपट्टीत राहण्याच्या संघर्षांवर मात केल्याबद्दल आणि सर्व अडचणींवर यशस्वीपणे मात केल्याबद्दल कौतुक करत आशा विद्यार्थिनींच्या कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन करत यशवंत कन्हेरे म्हणाले, झोपडपट्टीतील रहिवाशांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्याऱ्या यशस्वी विद्यार्थ्यांची प्रयत्नांची प्रशंसा केले व आपले ध्येय उद्दिष्ट गाठावे हा रस्ता खडतर आहे पण धैर्याने पार केल्यास आपले जीवन सुखकर आहे असे प्रतिपादन केले. (pcmc)

प्राध्यापक डॉ. प्रताप फलफले म्हणाले, आजकाल गोरगरीब व कष्टकऱ्यांचे मुलेच शिक्षणामध्ये यशस्वी होताना दिसत आहेत. अनेक शेतकऱ्यांचे, शेतमजुरांचे व कष्टकरी गोरगरिबांचे मुले त्यांच्या मातापित्यांचे कष्टाचे चीज करत अभ्यासात प्रगती करत, यशस्वी वाटचाल करीत आहेत. करीनाने सुद्धा यात कुठे मागे राहिले नाही. अपार कष्ट करून आईचे स्वप्न साकार केले. तिच्या पुढील शिक्षणासाठी वेळोवेळी मार्गदर्शन व आवश्यक मदत करण्याची ग्वाही देत शुभेच्छा दिले.

राष्ट्रपुरुष महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व अभिवादन करून कार्यक्रमाला प्रारंभ केला.

आरोग्य निरीक्षक महेश आढाव यांनी अशा विद्यार्थ्यांसाठी आम्ही सर्व सेवक प्रोत्साहन देण्यासाठी सदैव तयार असल्याचे सांगितले. प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते शिवानंद चौगुले, बीव्हीजीचे मॅनेजर दीपक गायकवाड, शिवाजी खराडे आरोग्य सेवक संजय हिवाळे व त्यांचे सहकारी तसेच आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय