मुंबई : वाढते पशुधन आणि विभागाची प्रशासकीय गरज लक्षात घेऊन पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदे लवकरच भरण्यात येणार असल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी विधानपरिषदेत दिली.
याबाबत विधानपरिषद सदस्य अरुण लाड यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर उत्तर देताना पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार बोलत होते.
राज्यात लवकरच ७ हजार २३१ पदांची पोलीस भरती, विधानसभेत घोषणा
राज्यातील पशु वैद्यकीय दवाखान्यांच्या निकषांबाबत सर्वंकष आढावा घेण्यासाठी समिती गठित करण्यात आली असून या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर कार्यवाही करण्यात येईल. तसेच फिरते पशुवैद्यकीय दवाखाना म्हणून ॲम्ब्युलन्स सेवा सुद्धा सुरु करण्यात आली आहे असेही केदार यांनी यावेळी सांगितले.
या लक्षवेधी सूचनेमध्ये विधानपरिषद सदस्य विक्रम काळे, महादेव जानकर यांनी सहभाग घेतला होता.
शेतकऱ्यांचा केंद्र सरकार विरोधात पुन्हा एल्गार, 11 ते 17 एप्रिल दरम्यान देशभरात आंदोलनाची घोषणा
खुशखबर ! कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांसाठी विलासराव देशमुख अभय योजना जाहीर
राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लिमिटेड, येथे विविध पदांची भरती