तपशीलवार माहितीसाठी CITU ने केला दौरा
पिंपरी चिंचवड : उरवडे, मुळशी येथील एस. व्ही. एस. अव्हा या केमिकल कंपनीस आंतरराष्ट्रीय दर्जाचे ISO 9001 हे प्रमाणपत्र मिळालेले होते. उत्कृष्ठ सुरक्षित उत्पादन व्यवस्था आणि चांगले व्यवस्थापन असणाऱ्या कंपन्यांना हे प्रमाणपत्र दिले जाते. या प्रमाण पत्राचा आढावा दरवर्षी घ्यावा लागतो, तसेच पर्यावरण आणि औद्योगिक सुरक्षा, घातक रसायन उत्पादन सुरक्षा प्रणालीसाठी ISO-14001 आणि नॅशनल सेफ्टी कौंसिल इंडिया(NSC) प्रमाणपत्र असल्याशिवाय उत्पादन करता येत नाही.
अशा उत्पादनासाठी अतिशय सुरक्षित वर्कशॉप असल्याशिवाय कंपनी अल्कोहोल, सॅनिटायझर इ ज्वलनशील उत्पादन करूच शकत नाही. उरवडे येथील कंपनीने सर्व नियमांची पायमल्ली केली. MIDC आणि PMRDA या सरकारच्या संस्थांनी या कंपनीच्या इमारतीकडे पाहिले नाही, अतिशय कोंदट जागेत महिला आणि पुरुष कामगार काम करत होते. औद्योगिक सुरक्षा नियमानुसार कंपनीच्या आवारात संकटकाळी कसे बाहेर ( EXIT) पडायचे, कुठे जमावे, असे काहीही नव्हते MIDC कडे अग्निशमन व्यवस्था नाही.
या सर्व दुर्दैवी अपघातातील सर्व कामगार त्यांच्या नशिबाने मेले नाहीत. महाराष्ट्र सरकारने पुणे जिल्ह्यातील सर्व औद्योगिक अस्थापनामध्ये जे अपघात किंवा मृत्यू होतात, त्याचा दैनंदिन आढावा घ्यावा. असे अपघात भविष्यात होऊ नयेत यासाठी झिरो अपघात रेकॉर्ड असलेल्या नामवंत कंपनीतील सेफ्टी स्टेवर्डचा सल्ला घ्यावा, असे मत सिटू कामगार संघटनेचे प्रतिनिधी कॉम्रेड गणेश दराडे यांनी व्यक्त केले आहे.
या अपघाताचे काही फोटो त्यांनी सादर केले आहेत. CITU पिंपरी चिंचवडच्या प्रतिनिधी मंडळात गणेश दराडे सह सचिन देसाई, शशिकांत महंगरे, अमिन शेख यांचा सहभाग होता.