बिजनौर : उत्तर प्रदेशातील बिजनौर येथून एक चित्तथरारक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरात प्रवासी बस नदीच्या पात्रात पुरात अडकलेली दिसत आहे. बस प्रवाहात वाहून जीवितहानी होऊ नये म्हणून क्रेन आणि प्रवासी उतरविण्यासाठी प्रशासन व स्थानिक नागरिकांनी जेसीबी आणल्याचे समोर येत आहे.
प्रवासी जीव वाचवण्यासाठी जेसीबीच्या बकेट मध्ये बसत आहेत. घटना हरदिवार-बिजनौर रस्त्यालगत असलेल्या मांडवली परिसरात वेगाने वाहणाऱ्या कोतवली नदीजवळ घडली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
उत्तर प्रदेशमध्ये सध्या १३ जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. समोर आलेल्या आकडेवारीनुसार आग्रा, अलिगड, बिजनौर, बदांयू, फार्रुखाबाद, फिरोजाबाद, गाझियाबाद, मथुरा, मुझफ्फरनगर, सहारनपूर, शाहजहाँपूर आणि शामली मधील मिळून ३८५ गावांमधील एक लाखाहून जास्त लोकांना पुराचा फटका बसला आहे.
हे ही वाचा :
पश्चिम बंगाल मध्ये मणिपूरची पुनरावृत्ती; महिला उमेदवाराची विवस्त्र धिंड
ब्रेकिंग : ‘या’ 4 जिल्ह्यांना आज ‘रेड ॲलर्ट’ ; तर “या” जिल्ह्यांना ‘ऑरेंज ॲलर्ट’
डॉ. आंबेडकर यांच्या नावाची स्वागत कमान पाडल्याच्या निषेधार्थ आंबेडकर अनुयायांचा ‘लॉग मार्च’
हातभट्टीमुक्त गाव संकल्पना राज्यात राबविण्याचा सरकारचा विचार
झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या अनुषंगाने लवकरच सर्वंकष धोरण – गृहनिर्माणमंत्री अतुल सावे
सहायक सरकारी अभियोक्ता गट-अ पदभरतीसाठी तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर