मुंबई : अक्षय कुमारच्या ‘बच्चन पांडे’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. अक्षयच्या या नव्या चित्रपटाच्या या ट्रेलरला चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसतोय. “बच्चन पांडे”चा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर अवघ्या काही तासात या ट्रेलरने 3 मिलियनचा टप्पा पार केला आहे. या चित्रपटात क्रिती सेनन, अर्शद वारसी, पंकज त्रिपाठी आणि जॅकलीन फर्नांडिस या कलाकारांचीही महत्वपूर्ण भूमिका आहे, बच्चन पांडे येत्या 18 मार्चला रिलीज होणार आहे.
फरहाद सामजी दिग्दर्शित या चित्रपटात क्रिती सेनन आणि जॅकलिन फर्नांडिसही मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटातील अक्षयचा लूक जबरदस्त आहे. त्याने गँगस्टर साकारला आहे; पण तो नेहमीपेक्षा वेगळा आहे. जास्त कू्रर आहे, तसेच विनोदीही आहे. क्रितीने एका दिग्दर्शकाची भूमिका साकारली आहे, तर जॅकलिनने अक्षयच्या गर्लफ्रेंडची भूमिका साकारली आहे.