Thursday, July 18, 2024
Homeकृषीकृषि योजना : भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, आजच अर्ज करा !

कृषि योजना : भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, आजच अर्ज करा !

 अ. लाभार्थी पात्रता – 

1) शेतकरी यांचे स्वत:चे नावे 7/12 असणे आवश्यक. 

2) जर 7/12 उतारावर लाभार्थी संयुक्त खातेदार असेल तर सर्व खातेदारांचे फळबाग लागवडी साठी संमती पत्र आवश्यक. 

3) 7/12 उतारा वर कुळाचे नाव असेल तर कुळाचे संमतीपत्र आवश्यक. 

4) ज्या शेतकरी यांच्या कुटुंबाची उपजीविका केवळ शेतीवर अवलंबून आहे त्यांना प्रथम प्राधान्य व त्यानंतर अन्य शेतकरी यांचा विचार करण्यात येइल (कुटुंबाची व्याख्या- पती पत्नी व अज्ञान मुले). 

प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत सौर कृषीपंपांसाठी अर्ज करण्याचे आवाहन, असा करा अर्ज !

ब. क्षेत्र मर्यादा 

किमान 0.20 हे. व कमाल 6.00 हे. पर्यंत लाभ घेता येइल. 

क. अनुदान मर्यादा – 

100 टक्के. 

अनुदान हे 3 वर्षाच्या कालावधीत मिळनार. 

प्रथम वर्षी 50 टक्के, दुसरे वर्षी- 30 टक्के, व तीसरे वर्षी- 20 टक्के. 

कृषी यांत्रिकीकरण योजना 2022 कृषी अवजारे करिता 50 ते 80% अनुदान

ड. अर्ज कुठे करावा- 

तालुका कृषी अधिकारी. 

इ. लागवड कालावधी –

जून ते मार्च. 

शेतकरी यांना आवश्यकतेनुसार सर्व फळपिकांच्या कलमा रोपांची लागवड करता येइल.  

शेतकरी याना फळबाग लागवडी साठी कृषी विद्यापीठ रोपवाटिका, राष्ट्रिय बागवानी मंडळ मार्फत मानांकित खाजगी रोपवाटिका तसेच कृषी विभागाच्या परवाना धारक रोपवाटीकेतून कलमे रोपे खरेदी करता येतील. 

तांत्रिक व प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर लाभार्थी यांनी फळबाग लागवड करावी. 

शेळी पालन योजना महाराष्ट्र, 75% अनुदानावर ऑनलाईन फॉर्म सुरु, लगेच भरा!

ई ) लागवड अंतर व मिळणारे अनुदान प्रती हेक्टर –

आंबा कलमे (10×10 मी)- 53900 रु.  

आंबा कलमे(5×5 मी)- 102530 रु. 

पेरु कलमे (6×6 मी)- 62472 रु. 

सन्त्रा मोसंबी कागदी लिंबू कलमे (6x 6मी)- 62578 रु. 

सिताफळ कलमे(5x 5 मी)-72798 रु. 

चिकू कलमे- 52355 रु. 

डाळिंब कलमे(4.5×3 मी)- 107783 रु. 

                                              

फ) अधिक माहितीसाठी –

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय