Friday, November 22, 2024
Homeआंबेगावसंविधानातील तरतुदीची प्रत्यक्ष अंमलबजवणीसाठी युवा - युवतींनी पुढे यावे – ॲड.दिपाली मोरे

संविधानातील तरतुदीची प्रत्यक्ष अंमलबजवणीसाठी युवा – युवतींनी पुढे यावे – ॲड.दिपाली मोरे

घोडेगाव येथे संविधान दिन साजरा

घोडेगाव : आदिम संस्था, एसएफआय, किसान सभेच्या आदिम संस्थेच्या कार्यालयात घोडेगाव येथे संविधान दिन साजरा करण्यात आला. 

आदिम संस्कृती अभ्यास, संशोधन व मानव विकास केंद्र, स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एस.एफ.आय.), अखिल भारतीय किसान सभा, आंबेगाव तालुका समितीच्या वतीने घोडेगाव येथे संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या विशेष व्याख्यान कार्यक्रमात. ॲड.दिपाली मोरे यांनी ‘भारतीय संविधान आजची आव्हाने व पुढील दिशा’ या विषयावर उपस्थित विद्यार्थ्यांना व नागरिकांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले कि, ‘संविधान समजून घेणे आणि त्याचा लाभ देशातील शेवटच्या घटका मिळण्यासाठी त्याची प्रभावी अंमलबजावणी साठी प्रयत्न करणे हि आजच्या तरुणाईची जबाबदारी आहे. आजच्या विषमतेच्या वातावरणात संविधानच आपल्या सर्वांना भारतीय असल्याची ओळख प्राप्त करून देते आहे.’ 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना किसान सभेचे राजू घोडे यांनी सांगितले कि, ‘आजची लोकशाही व्यवस्था हि प्रातिनिधिक लोकशाही व्यवस्था आहे, संविधानात अपेक्षित असलेली आणि खऱ्या अर्थाने ७३ व्या घटना दुरुस्तीने लोकशाही गणराज्य घडविण्यासाठीचा मार्ग मोकळा झाला आणि गण म्हणजेच नागरिकांना, ग्रामसभेला विशेष महत्व आणि सत्तेचे विकेंद्रीकरण केले. ग्रामसभा हि लोकशाहीचे सर्वोत्तम उदाहरण आहे.’ 

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदिम संस्थेचे समीर गारे यांनी केले, तर सूत्रसंचालन एसएफआय चे आंबेगाव तालुका सहसचिव योगेश हिले, आभार जिल्हा अध्यक्ष अविनाश गवारी यांनी मांडले. संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन करून कार्क्रमाचा समारोप करण्यात आला. 

यावेळी आदिम संस्थेचे स्नेहल साबळे, समीर गारे, दिपाली खामकर, राहुल कारंडे, एसएफआयचे पुणे जिल्हाध्यक्ष अविनाश गवारी, एस.एफ.आय.आंबेगाव तालुका अध्यक्ष आणि बोरघर ग्रामपंचायत सदस्य दिपक वालकोळी, फुलवडे ग्रामपंचायत उपसरपंच तेजस्विनी भारमळ, किसान सभेचे राज्य जिल्हा सहसचिव अशोक पेकारी, ॲड.अश्विनी दगडे, कुष्णा गाडेकर, किसान सभेचे अर्जुन काळे, सुभाष भोकटे, दत्ता गिरंगे आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

लोकप्रिय