Friday, November 22, 2024
Homeताज्या बातम्याकंगना रणौतला थप्पड मारणाऱ्या महिलेला प्रसिद्ध गायकाकडून नोकरीची ऑफर

कंगना रणौतला थप्पड मारणाऱ्या महिलेला प्रसिद्ध गायकाकडून नोकरीची ऑफर

Vishal Dadlani : हिमाचल प्रदेशमधून नवनिर्वाचित खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौत हिला चंदीगढ विमानतळावर एका सीआयएसएफच्या महिला जवानाने थप्पड मारल्याची घटना घडली. कंगना रणौतने शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या महिला १०० रुपये देऊन आणल्या जातात असे विधान केले होते. त्याचा राग मनात ठेवून या सीआयएसएफच्या महिला जवानाने थप्पड मारल्याचे सदर महिला जवानाने म्हटले आहे. या घटनेवर आता देशभरातून विविध प्रतिक्रिया येत आहे. काहींनी या घटनेचा निषेध केला आहे तर काहींनी सीआयएसएफच्या महिला जवानाची बाजू घेतली आहे.

कंगना रणौतला कॉन्स्टेबलने थप्पड लगावल्याच्या प्रकरणाची सध्या देशभरात जोरदार चर्चा सुरू आहे. एक वर्ग कंगनाला थप्पड मारल्याच्या घटनेचे समर्थन करत नाही मात्र तिच्या बाजूने उभा आहे. अशात आता या प्रकरणी त्या महिला कॉन्स्टेबलला निलंबित करण्यात आले आहे. कुलविंदर कौर असे या CISF महिला कॉन्स्टेबलचे नाव आहे.

या प्रकरणावर प्रसिद्ध संगीतकार आणि गायक विशाल ददलानी (Vishal Dadlani) यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीजच्या माध्यमातून या थप्पड मारण्याच्या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये त्यांनी सीआयएसएफ जवानाच्या समर्थनार्थ बोलताना दिसत आहे.

Vishal Dadlani यांनी काय म्हटले आहे ?

विशाल ददलानीने इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर करून त्या महिला सुरक्षा रक्षकाला नोकरीची ऑफर दिली आहे. सीआयएसएफ जवान कुलविंदर कौर यांच्यावर काही कारवाई झाल्यास तिच्यासाठी नोकरीची व्यवस्था करू, असे त्यांनी म्हटले आहे. ते म्हणाले, ‘मी हिंसेचे समर्थन करत नाही, पण ती सीआयएसएफ जवान का चिडली हे मला पूर्णपणे समजले. त्या महिला शिपायावर कोणतीही कारवाई झाल्यास तिला नोकरी करायची असेल तर मी नोकरी देऊ शकतो. जय हिंद, जय जवान, जय किसान.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : शिंदेच्या शिवसेनेत पुन्हा भुकंप होणार ? अनेक आमदार ठाकरेंच्या संपर्कात

ब्रेकिंग : नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडूंनी टाकला बाँम्ब

मोठी बातमी : कर्ज घेणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, RBI ने घेतला मोठा निर्णय !

ब्रेकिंग : निलेश लंके यांचे स्विय सहाय्यक (PA) यांच्यावर प्राण घातक हल्ला, १२ जणांविरोधात गुन्हा दाखल

लोकसभा निवडणुक संपली तरी ‘या’ मतदारसंघात राहणार आचारसंहिता, वाचा काय आहे कारण !

साफसफाई करताना पाण्यात “हे” वापरा , मुंग्या, झुरळ होणार नाहीत

10 वी, 12 वी, ITI उत्तीर्णांना विविध विभागात नोकरीची सुवर्णसंधी

ब्रेकिंग : नवनिर्वाचित खासदार कंगना रणौतला थप्पड मारणारी महिला जवान निलंबित

एकही जागा न मागता मी सपोर्ट केला मला कॅबिनेट मंत्री करा – रामदास आठवले

मोठी बातमी : लोकसभेतील विरोधी पक्ष नेत्याच्या पदासाठी “यांच्या” नावाची चर्चा

राहुल गांधी यांना एका खासदारकीचा राजीनामा द्यावा लागणार, वाचा काय आहे कारण !

मोठी बातमी : लोकसभेतील विरोधी पक्ष नेत्याच्या पदासाठी “यांच्या” नावाची चर्चा

संबंधित लेख

लोकप्रिय