Tuesday, September 17, 2024
HomeNewsएकनाथ शिंदे यांच्या रटाळ वाचून दाखवलेल्या भाषणाने जनता कंटाळली लोकं निघून जातानाचा...

एकनाथ शिंदे यांच्या रटाळ वाचून दाखवलेल्या भाषणाने जनता कंटाळली लोकं निघून जातानाचा व्हिडिओ व्हायरल !

दसरा मेळाव्यातल्या सभेमध्ये शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपवरही निशाणा साधला आहे. “ज्यावेळेला शिवसेनेत गद्दारी केली.
होय गद्दारच म्हणणार. मंत्रीपदं तुमच्या बुडाला चिपकलेली असली तरी ती काही काळापुरती आहेत. पण कपाळावरचा गद्दारीचा शिक्का या जन्मी तरी पुसून पुस्ता येणार नाही”, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटावर बाण मारला. विशेष म्हणजे या मेळाव्याला शिवतीर्थावरील ऐतिहासिक जनसागर लोटल्याचं पाहायला मिळालं.

दरम्यान, शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन ठिकाणी दसरा मेळावा झाला. शिवाजी पार्कमध्ये उद्धव ठाकरेंची सभा झाली. त्याचवेळी बीकेसी ग्राऊंडवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेला ठाकरे कुटुंबातील अनेकांनी हजेरी लावली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. एकनाथ शिंदे यांनी लांबलचक भाषण केले. यावेळी शिंदे यांचं ऐतिहासिक रटाळ भाषण सुरू असताना अर्ध्याहून अधिक लोक निघून गेल्याचं कॅमेऱ्यात कैद झालं आहे.

एकनाथ शिंदे यांचे भाषण वेळेपेक्षा जास्त लांबल्याची चर्चा आहे. त्यामुळे लोकांनी उशीर होत असल्यामुळे सभेतून काढता पाय घेतला. यापूर्वी शिंंदे गटाने परराज्यातून सभेसाठी माणसे आणल्याची चर्चा होती. तसे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. दरम्यान एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या प्रत्येक टीकेला उत्तर दिले आहे. मात्र कागदावर वाचून वाचून भाषण करणाऱ्या शिंदेंच्या भाषणाला लोकं कंटाळल्याचं पाहायला मिळालं.

संबंधित लेख

लोकप्रिय