Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र सरकारच्या महिला व बालविकास विभागाच्या “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याच्या हप्त्याची रक्कम पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर, म्हणजेच 30 एप्रिल 2025 रोजी सकाळपासून सुरू करण्यात आली आहे. आज महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने या योजनेचा दहावा हप्ता प्रत्यक्षात महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. (हेही वाचा – 10वी, 12वी चे निकाल कधी जाहीर होणार ? संभाव्य तारखा पहा !)
ही योजना मागील वर्षी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने सुरु करण्यात आली होती. मध्य प्रदेश राज्याच्या ‘लाडली बहना’ योजनेच्या धर्तीवर राबवण्यात आलेल्या या योजनेत 21 ते 65 वर्षे वयोगटातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांचा आर्थिक लाभ दिला जातो. (हेही वाचा – महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत 2795 पदांची भरती)
त्या महिलांना मिळणार 500 रुपयांचा हप्ता | Ladki Bahin Yojana
अक्षय्य तृतीयेच्या शुभदिनी सुरू झालेल्या या प्रक्रियेनंतर काही तासांतच रक्कम लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या योजनेतून आतापर्यंत 9 हप्त्यांमध्ये एकूण 13,500 रुपये लाभार्थींना मिळाले असून, एप्रिल महिन्याच्या 1500 रुपयांचा हप्ता मिळाल्यानंतर हा एकूण आकडा 15,000 रुपयांवर पोहोचणार आहे. (हेही वाचा – ब्रेकिंग : कोलकात्यातील हॉटेलला भीषण आग, 14 जणांचा मृत्यू, अनेक जखमी)
तथापि, पीएम किसान व नमो शेतकरी महासन्मान निधीचा लाभ घेणाऱ्या महिलांना या योजनेअंतर्गत फक्त 500 रुपयांचा हप्ता दिला जाणार आहे. (हेही वाचा – ब्रेकिंग : एटीएममधून पैसे काढणं महागणार, 1 मेपासून नवे दर)
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी यापूर्वी स्पष्ट केलं होतं की दिनांक 3 जुलै 2024 नंतर या योजनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. एकाही पात्र भगिनीला योजनेतून वगळण्यात आले नसल्याचे त्यांनी नमूद केले होते. (हेही वाचा – दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटूंबीयांना राज्य सरकारकडून तब्बल ‘इतक्या’ लाखांची मदत)
एप्रिल महिन्यात किती महिलांना या योजनेचा लाभ मिळाला, याबाबतची अधिकृत माहिती येत्या काही दिवसांत जाहीर होण्याची शक्यता आहे. (हेही वाचा – मोठी बातमी : देशात होणार जातीनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाचा ऐतिहासिक निर्णय)