पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) – कामगार आयुक्त, किंवा सहाय्यक कामगार आयुक्त यांना प्रामुख्याने औद्योगिक वाद रोखणे आणि त्यांचे निराकरण करणे, कामगार कायद्यांची अंमलबजावणी करणे औद्योगिक आस्थापनांमधील कामगारांच्या कल्याणाला चालना देणे ही कर्तव्ये सोपवण्यात आली आहेत. (PCMC)
पूर्वी पिंपरी चिंचवड हा औद्योगिक परिसर कामगार आणि कंपन्यांसाठी प्रसिद्ध होता.
त्यामुळे वाकडेवाडी येथे कामगार आयुक्त कार्यालय होते. २००० साली चाकण औद्योगिक क्षेत्र MIDC शासनाने जाहीर केले.
चाकण येथे सुमारे ४५० हून जास्त मोठ्या कंपन्या आणि शेकडो लघुउद्योग सुरू झाले आज २५ वर्षे झाली आहेत.
येथील MIDC मध्ये ESIS हॉस्पीटल नाही.
येथे मोठ्या कारखान्यात ठेकेदारी, स्थलांतरित आणि रोजंदारी कामगार काम करतात. त्यांची नोंदणी करणे, त्यांच्या तक्रारी समस्या जाणून घेणे. त्यांना किमान मिळते का? ई एस आय, किमान वेतन, साप्ताहिक सुट्या आदी सुविधा मिळतात का? यासंबंधी अनेक कामगार कल्याण संबंधी कामे कामगार आयुक्तांच्या अखत्यारीत असतात. (PCMC)
एखादा अपघात झाल्यास पिंपरी चिंचवड येथे मनपा हॉस्पिटल किंवा तुटपुंज्या सुविधा असलेल्या चिंचवड येथील ई एस आय हॉस्पिटल जखमी कामगारास घेऊन जावे लागते. अशी आजची परिस्थिती आहे. बहुसंख्य कंपन्या ठेकेदार कंत्राटी कामगार, स्थलांतरित, रोजंदारी कामगारामार्फत येथील कामे करून घेतात. या कामगारांची कोणतीही जबाबदारी मूळ कंपनीकडे नसते.
अनेक कंपन्या उत्पादन पूर्ण करण्यासाठी असंघटित व कंत्राटी कामगार वापरतात. परंतु असंघटित कामगारांना भोजन नाश्त्याची व्यवस्थ करत नाहीत.
१२ हजार ते १५ हजार रुपयात लाखो असंघटित कामगार काम करत आहेत. त्यांना बस, हॉस्पिटल, आरोग्य सुविधा नाहीत. पाळणाघर नको म्हणून येथे फक्त अविवाहित मुलीनं कामाला ठेवले जाते. त्यांना सुटीच्या दिवशी पण कामाला बोलावतात. त्यांना मासिक पाळीच्या रजा मिळत नाही. (PCMC)
आज चाकण औद्योगिक क्षेत्रात मूलभूत सुविधा, रस्ते, कामगार आयुक्त कार्यालय, कामगारांसाठी ओपीडी नसल्यामुळे कार्पोरेट दर्जाची सुविधा नसल्यामुळे कामगार आणि उद्योजक हैराण झाले आहेत.
येथे ठेकेदार कामगार, स्थलांतरित कामगार यांचे प्रमाण मोठे आहे.
राज्य आणि केंद्र सरकारने येथील या ठिकाणी कामगार आयुक्त कार्यालय, आणि सुसज्ज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल स्थापन करावे, अशी मागणी चाकण येथील स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष जीवन येळवंडे यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे.
---Advertisement---
---Advertisement---
PCMC : चाकण एमआयडीसीच्या कामगारांचे प्रश्न सोडवा – कामगार नेते जीवन येळवंडे
---Advertisement---
- Advertisement -