अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने दूध दरवाढीसाठी आंदोलन सुरू आहे. मात्र मागील वर्षी सत्ते मध्ये असणारा भारतीय जनता पक्ष यांनी देखील या आंदोलनांमध्ये उडी मारली आहे. मुळात शेतकऱ्यांची कोणताही संबंध नसताना केवळ शेतकऱ्यांचा मतपेटी साठी वापर करणे हा एकमेव उद्योग भाजपा आणि संघाशी एकनिष्ठ असणाऱ्या लोकांचा आहे. याचा परिचय किसान सभेच्या नाशिक ते मुंबई किसान लॉंग मार्च दरम्यान सबंध महाराष्ट्राला आला.
महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना फडणवीस सरकार अत्यंत गाफील होते इतके की शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा डेटा वेबसाईटवरून गायब करण्यात आला आणि आणि सर्व काही ठीक आहे असे भासवण्यात आले मात्र परिस्थिती अत्यंत गंभीर होती.
देशातील शेतकऱ्यांना धुळीस मिळवणार्या केंद्र सरकारचा कूटनीतीचा हा एक भाग आहे. महाराष्ट्रातील राज्य सत्तेपासून वंचित राहिलेल्या भाजपाने दुसऱ्यांनी केलेली आंदोलने हायजॅक करून स्वतः श्रेय लाटण्याचा जो उद्योग केलेला आहे तो अत्यंत निषेधार्थ आहे.
अखिल भारतीय किसान सभा ही शेतकर्यांच्या न्यायासाठी हक्कासाठी झटणारी भारतातील एकमेव शेतकरी संघटना आहे. तिचे कार्यकर्ते शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर ती सतत जागरूक असतात आणि रस्त्यावर उतरून आपल्या मागण्या या सरकारला मान्य करायला भाग पाडतात हा इतिहास आहे. मात्र असे असताना देखील केवळ शेतकरी मते मिळवण्यासाठी शेतकऱ्याचा पालनकर्ता असेच सोंग केलेल्या भाजपावर सर्वच ठिकाणाहून टीका होत आहे.
रत्नदिप कल्पना गुरूदेव सरोदे,
पुणे