घोडेगाव : महाराष्ट्र राज्याच्या वैचारिक, सामाजिक जडणघडणीत छत्रपत्री शाहू महाराज यांचे विशेष योगदान आहे. आरक्षणाचे जनक म्हणजे छत्रपती शाहू महाराज होय, असे प्रतिपादन बी.डी. काळे महाविद्यालयाच्या प्रा.डॉ.चांगुणा कदम यांनी केले.
घोडेगाव येथे आदीम संस्था, किसान सभा व एस.एफ.आय यांच्या वतीने हा आयोजित कार्यक्रमात ‘शाहू महाराज यांचे लोककल्याणकारी कार्य’ या विषयावर त्या बोलत होत्या.
महागाईचा सर्वसामान्यांना आणखी एक झटका, घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती ‘इतक्या’ वाढल्या
यावेळी त्यांनी शाहू महाराज यांचे शिक्षण विषयक विचार व कार्य तसेच सामाजिक सुधारणा याविषयी केलेले कार्य व विचार याविषयी सविस्तर मांडणी केली. आजच्या काळात शाहू महाराज यांचे विचार व कार्य किती महत्वपूर्ण आहे, याविषयी त्यांनी यथोचित मार्गदर्शन केले.
याप्रसंगी प्रा.प्रवीण पारधी, आदीम संस्थेचे डॉ.अमोल वाघमारे, किसान सभेचे अमोल गिरंगे, संदीप काठे, शंकर काठे, एस.एफ.आय.संघटनेचे अविनाश गवारी इ.उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सत्यपाल कांबळे यांनी केले तर आभार नंदन लोंढे यांनी मानले.
जिल्हा परिषद जालना अंतर्गत विविध पदांसाठी भरती, असा करा अर्ज !
जिल्हा परिषद नागपूर अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती, 17 मे अर्ज करण्याची शेवटची तारीख