पिंपरी चिंचवड : शहरातील सर्वपक्षीय व सर्व सामाजिक संस्थांनी एकत्रित येत सकाळी १० वा. केएसबी चौक येथील छत्रपती राजश्री शाहू महाराजांच्या पुतळ्यासमोर शंभर सेकंद स्तब्ध उभे राहून या लोकराजाच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी बोलताना मानव कांबळे म्हणाले की, राजा कसा असावा त्याने प्रजेचे संगोपन कशाप्रकारे करावे व राज्याची भरभराट कशी करावी हे जर पाहायचे असेल तर ते राजर्षी शाहू महाराज यांच्याकडे पाहिल्यावर दिसून येते. काळाच्या पुढे जाऊन विकासाची खरी दृष्टी असणारे लोकराजे शाहू महाराज होते.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत रिक्त पदांसाठी भरती, थेट मुलाखती द्वारे होणार निवड !
तर मारुती भापकर यांनी शाहू राजांबद्दल बोलत असताना आजच्या राज्यकर्ते मंडळीनी शाहू विचार जोपासला पाहिजे व समाजाला नवी दिशा दिली पाहिजे. दोन जाती – धर्मामध्ये तेढ निर्माण होईल अशी कृती कुणी करू नये. सद्यस्थितील दुषित राजकारण समाजाला घातक असून शाहू राजाचा समतेचा विचार याला तारु शकेल, तर राष्ट्रवादीचे अजित गव्हाणे यांनी शाहू महाराजाचे उर्वरित कार्य पुढे घेऊन जाणार असल्याचे व सामाजिक सलोखा राखण्याचे आवाहन केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, काँग्रेसचे कैलास कदम, स्वराज अभियान महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मानव कांबळे, वंचित बहुजन आघाडीचे देवेंद्र तायडे, एमआय एम पक्षाचे धम्मराज साळवे, आरपीआय आठवले गटाचे स्वप्निल कांबळे, माजी.महापौर मंगला कदम, राष्ट्रवादी महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट, माजी नगरसेवक मारुती भापकर, संजय वाबळे, विनायक रणसुभे, प्रसाद शेट्टी, संदिपान झोंबाडे, काशिनाथ नखाते, सतीश काळे, धनाजी येळकर पाटील, उदय पाटील, सम्राट जकाते, अंकुश कानडी, बी.बी. शिंदे, बाळासाहेब भागवत, नीरज कडू, नरेंद्र बनसोडे, कोल्हापूर जिल्हा मित्र मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग पाटील कार्याध्यक्ष जगदीश परीट, सेक्रेटरी सुनील पाटील, शरद पाटील, उद्योजक अशोक दुर्गुळे, श्रीकांत चौगुले, मनोहर चौगुले उपस्थित होते.
– क्रांतिकुमार कडुलकर
जिल्हा परिषद जालना अंतर्गत विविध पदांसाठी भरती, असा करा अर्ज !