मुंबई : शिवसेना (उद्धव ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. ठाकरे कुटुंबातील लग्नसोहळ्याच्या निमित्ताने हे दोन बंधू मुंबईत एकत्र आले होते. या भेटीत उद्धव ठाकरे, राज ठाकरे, आदित्य ठाकरे, अमित ठाकरे, आणि रश्मी ठाकरे यांच्यासह संपूर्ण कुटुंब एकत्र दिसले. (Thackeray brothers)
लग्नसोहळ्यात राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काही वेळ एकमेकांशी संवाद साधला. गेल्या पाच दिवसांत ही दुसरी वेळ आहे, जेव्हा दोघे एकत्र दिसले आहेत. यापूर्वी एका कौटुंबिक कार्यक्रमातही राज ठाकरे यांनी उपस्थिती लावली होती, जिथे रश्मी ठाकरे यांनी त्यांचं स्वागत केलं होतं.
ठाकरे बंधूंनी एकत्र यावं, अशी भावना सध्या मराठी जनतेत व्यक्त होत आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत शिवसेना (उद्धव गट) आणि मनसेला अपेक्षित यश मिळालं नाही. मनसेने ‘एकला चलो रे’ चा नारा देत स्वतंत्र निवडणूक लढवली होती, तर महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे गटाने निवडणूक लढवली. निवडणुकीदरम्यान दोघांनी एकमेकांवर जोरदार टीका केली होती.
निवडणुकीतील पराभव आणि निवडणुकीदरम्यानच्या परस्परविरोधी भूमिकेनंतर राज आणि उद्धव ठाकरे यांची भेट विशेष ठरत आहे. ही भेट आगामी राजकीय समीकरणांवर कसा प्रभाव टाकेल, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या शक्यतेवर सध्या सोशल मीडियावरही जोरदार चर्चा सुरू आहे.
Thackeray brothers
हे ही वाचा :
ब्रेकिंग : शरद पवार यांच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात
BMC : बॉम्बे मर्कंटाइल को-ऑपरेटिव्ह बँक अंतर्गत विविध पदांसाठी भरती
RITES लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती, आजच अर्ज करा
ब्रेकिंग : राहुल गांधी आज परभणी दौऱ्यावर, सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना भेट घेणार
मोठी बातमी : राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर, वाचा कुणाला कोणते खाते
राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्था अंतर्गत विविध पदांसाठी भरती
खूशखबर : बँकेत तब्बल 13 हजार पदांसाठी मेगा भरती