नारायणगाव : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील दोन वर्ष तमाशा फडमालक व कलावंत मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले होते. त्यामुळे ग्रामीण भागातील जत्रेचं आकर्षण असलेली तमाशा लोककला नष्ट होते की काय ? अशी भीती तमाशा फड मालकांच्या मनात निर्माण झाली होती. पाच ते सहा महीन्यांपूर्वी तमाशाला वाचविण्यासाठी तमाशाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या नारायणगाव नगरीत तमाशा फड मालक रघुवीर खेडकर, अविष्कार मुळे, मोहीत नारायणगावकर व कलावंतांनी केलेल्या आमरण उपोषणाला मोठा प्रतिसाद मिळाला होता.
जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी तमाशा फड मालकांच्या उपोषणस्थळी जाऊन त्यांच्या सर्व मागण्यांचा महाराष्ट्र शासन सहानुभूतीपूर्वक विचार करून आर्थिक मदत मिळवून देईल असे आश्वासन दिले व तमाशा कलावंतांना सूरु असलेले आमरण उपोषण सोडण्यास भाग पाडले.
पुणे : जुन्नरच्या ८ मुलींची ५० किलोमीटरची सायकलवारी !
त्यानंतर तमाशा फड मालकांच्या शिष्टमंडळाने आमदार अतुल बेनके यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांची भेट घेऊन आपल्या व्यथा मांडल्या होत्या. त्यावेळी शासनाच्या वतीने तमाशा फड मालक व कलावंतांना लवकरच शासकीय अनुदान दिले जाईल असे सांगण्यात आले. परंतु आजपर्यंत महाराष्ट्र शासनाकडून तमाशा फड मालकांना अनुदान मिळाले नसल्याची खंत अखिल भारतीय मराठी तमाशा परिषदेचे अध्यक्ष व तमाशा फडमालक रघुवीर खेडकर, आविष्कार मुळे, मोहित इनामदार यांनी बोलून दाखवली.
मुंबईत चालू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षांनी तमाशा कलावंतांच्या अनुदाना संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी तमाशा कलावंतांसाठी अनुदान उपलब्ध करुन देणार असल्याचे सांगितले. परंतु तशी कुठलीही आर्थिक तरतूद नसल्याचे विरोधी पक्षाकडून सांगण्यात आले.
माजी आमदार शरद सोनवणे यांचा आमरण उपोषणाचा इशारा
याचाच अर्थ महाराष्ट्र सरकारने तमाशा फड मालक व कलावंतांना आर्थिक मदतीचे दिलेले आश्वासने पूर्ण होत नसल्याचे तमाशा फड मालकांचे म्हणणे आहे. तरी आमदार अतुल बेनके व लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन तमाशा फडमालकांना लवकरात लवकर आर्थिक मदत मिळवून द्यावी अशी मागणी तमाशा फड मालकांकडून करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार शासनाकडून देण्यात आलेली मुख्य आश्वासने व त्याची पूर्तता
१) वृद्ध कलावंतांसाठी ग्रेड नुसार ३२००,२७००,२२०० मानधन वाढवून ते ७०००,६०००,५००० करण्यात येईल.
२) तमाशाच्या मोठ्या फड मालकांना २ लाख तर लहान फड मालकांना १ लाखाचे मानधन देण्यात येईल.
३) शासनाने ठराविक पात्र तमाशा फडमालक व कलावंतांची अपूर्ण कागदपत्र २० मार्च २०२२ पर्यंत मागितली आहे.
४) इतर कलावंतांना जिल्हाधिकारी कार्यालयातून अनुदानाचे वाटप करण्यात येईल.
५) अनुदानाचे वाटप एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात होईल.
मुंबई : जुन्नर च्या अंगणवाडी कर्मचारी धडकल्या आझाद मैदानावर !
ब्रेकिंग : चीन मध्ये कडक लॉकडाऊन, सक्रिय रुग्णांची संख्या 6 कोटी !