Tuesday, November 5, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडपत्राशेड लिंकपुनर्वसन प्रकल्पातील हस्तांतर केलेल्या इमारती मधील अपूर्ण कामे पूर्ण करा -...

पत्राशेड लिंकपुनर्वसन प्रकल्पातील हस्तांतर केलेल्या इमारती मधील अपूर्ण कामे पूर्ण करा – सुंदर कांबळे

विद्युत मीटर, पाणी, लिफ्ट ची समस्या – नागरिकांची दमछाक 

पिंपरी चिंचवड : पत्राशेड लिंकपुनर्वसन प्रकल्पातील हस्तांतर केलेल्या इमारती मधील अपूर्ण कामे पूर्ण करा, अशी मागणी असंघटित कामगार काँग्रेस पिंपरी चिंचवड चे शहराध्यक्ष सुंदर कांबळे यांनी आयुक्त राजेश पाटील यांचेकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

महानगरपालिकेच्या जेएनएनयूआरएम अंतर्गत ज्या ५ इमारती पत्राशेड लिंकरोड या ठिकाणी बांधल्या आहेत. त्यापैकी एका इमारतीचे वाटप करण्यात आले आहे. परंतु त्या इमारती मधील सदनिकाधारकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. अनेक संकटाला सामोरे जावे लागत आहे. या इमारतीमध्ये लिफ्ट नसल्यामुळे घर शिफ्टींगला खूप त्रास होत आहे. 

घरेलू कामगारांची कामगार आयुक्त कार्यालयावर तीव्र निदर्शने !

ब्रेकिंग : चीन मध्ये कडक लॉकडाऊन, सक्रिय रुग्णांची संख्या 6 कोटी !

सातव्या मजल्यापर्यंत घरातील सामान नेण्यासाठी नागरीकांची दमछाक होत आहे. त्याचप्रमाणे पिण्याचे पाणी सहाव्या सातव्या मजल्यापर्यंत पोहचत नाही तसेच काही सदनिकाधारकांच्या सदनिकामध्ये लाईट मिटर देखील बसविलेले नाही. त्यामुळे त्या सदनिकाधारकांना अंधारामध्ये रहावे लागत आहे.

सर्वात मोठी अडचण म्हणजे या इमारतीचे काम हे निकृष्ठ दर्जाचे झालेले आहे. प्रत्येक सदनिका ही लिकेज होत आहे. हि इमारत बनवत असताना केवळ आणि केवळ ठेकेदाराला पोसण्याचे काम आपल्या विभागातील अधिकारी व तत्कालीन नगरसेवक यांनी केलेले दिसून येत आहे  तेव्हा या इमारती जो पर्यंत काम पूर्ण व्यवस्थीत करून देत नाही, तो पर्यंत त्या ठेकेदाराचे बिल देवू नये व लवकरात लवकर या इमारतीमध्ये राहणा-या नागरिकांचे प्रश्न सोडवावेत, अन्यथा आम्हाला या ठिकाणी स्थलांतरीत केलेल्या सदनिकाधारकांची फसवणूक प्रकरणी कोर्टात याचिक दाखल करावी लागेल कृपया याची नोंद घ्यावी, असेही सुंदर कांबळे यांनी म्हटले आहे.

– क्रांतिकुमार कडुलकर

मुंबई : अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा आझाद मैदानावर एल्गार

राज्यात लवकरच ७ हजार २३१ पदांची पोलीस भरती, विधानसभेत घोषणा

संबंधित लेख

लोकप्रिय