Sunday, December 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडडेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया चे तालुका अधिवेशन संपन्न

डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया चे तालुका अधिवेशन संपन्न

पिंपरी चिंचवड : डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाचे वे पिंपरी चिंचवड शहरांमध्ये शहीद भगतसिंग हॉल येथे तालुका अधिवेशन संपन्न झाले. अधिवेशनाची सुरुवात सेक्रेटरी कॉम्रेड सचिन देसाई यांच्या हस्ते ध्वजारोहन करून झाली. यावेळी शहीद भगतसिंग व चंद्रशेखर आजाद यांच्या घोषणांनी सारा परिसर दुमदुमला होता. 

चंद्रशेखर आझाद यांच्या प्रतिमेस अभिवादन करून स्वागत पूर्व भाषण मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पुणे जिल्हा सेक्रेटरी कॉम्रेड गणेश दराडे केले. यावेळी दराडे म्हणाले, देशासमोरील संकटे व धर्मांध आणि जातीय शक्तींचा वाढता प्रभाव व हिंदुत्व शक्तीनं कडे असलेले युवकांचे आकर्षण या बद्दल डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाने शहर पातळी वर युवकांची जागृती करावी व आंदोलन उभारावे.

रशिया आणि युक्रेन युध्द : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केली भूमिका जाहीर

चार आंतरराष्ट्रीय पुरस्कार पटकावणारा शुभंकर आहे तरी कोण ?

■ नवनिर्वाचित तालुका कमिटी पुढीलप्रमाणे :

स्वप्निल जेवळे, शिवराज अवलोल, राहुल गोपीनाथन, भार्गवी लाटकर, विनोद चव्हाण, देविदास जाधव, ख्वाजा जमखाने निमंत्रक म्हणून प्रफ्फुल कोडकर व गौरव पानवलकर वरील सदस्यांची निवड करून तालुका सेक्रेटरी म्हणून कॉ. अमिन शेख यांची एक मताने निवड करण्यात आली. अध्यक्ष पदी संतोष गायकवाड यांची निवड करण्यात आली.

डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया पुणे जिल्हा  सेक्रेटरी डॉ. ज्ञानेश्वर मोटे यांनी नवनिर्वाचित तालुका कमिटीला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व  डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया या संघटनेच्या काम भविष्यकाळात युवकांच्या बेरोजगारीच्या प्रश्नावर कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून प्रस्थापित व व्यवस्थेविरोधात आंदोलन व संघर्ष करण्याचा निर्धार करण्याची सूचना केली.  

रशियाकडून व्हॅक्यूम बॉम्बचा वापर ! काय आहे या बॉम्ब ची खासियत?

या अधिवेशनाचा समारोप नवनिर्वाचित तालुका कमिटी सेक्रेटरी कॉ. अमिन शेख यांनी युवकांसमोरील बेरोजगारी सारखे भयंकर संकटे व धर्मांध आणि जातीय शक्तींचा वाढता प्रभाव याच्या विरोधात  नवनिर्वाचित तालुका कमिटी संघर्ष करेल, असा विश्वास व्यक्त केला.

दहावी, बारावी पास विद्यार्थ्यासाठी नोकरीची चांगली संधी : IGI एव्हिएशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड मध्ये 1095 जागांची भरती !

संबंधित लेख

लोकप्रिय