अभिनेता शुभंकर तावडे हा एक उत्तम अभिनेता असून त्याने वेगवेगळ्या कलाकृतींच्या साह्याने स्वतःला वेळोवेळी सिद्ध केले आहे. परंतु त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या सर्वोत्कृष्ट कलाकृतींवर चार आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचा ठसा उमटवलेला आहे. “8 दोन 75” या चित्रपटातील त्याच्या उत्तम अभिनय यासाठी त्याला चार वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय पुरस्कारांमध्ये सर्वोत्तम अभिनयासाठी पुरस्कार मिळाले आहेत.
दृक इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवल मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता, इंडो डच इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता, गंगटोक इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल मधील सर्वोत्कृष्ट अभिनेता, बिरसा मुंडा इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवल मध्ये सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता अशा एकूण चार फिल्म फेस्टिवल मध्ये त्याचा सन्मान झाला आहे.
तो म्हणतो की “आपला अभिनय इतर देशातील सीने रसिकांनी पहावा अशी प्रत्येक सिने कलाकाराची मनापासूनची इच्छा असते. त्यामुळे देशात आणि परदेशात माझी फिल्म झळकने ही माझ्यासाठी अत्यंत आनंददायी गोष्ट होती. रसिकांना माझे काम आवडत असून सर्वत्र माझ्या अभिनयाचे कौतुक झाले आहे त्यात अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट चार आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त करणं म्हणजे दुग्धशर्करा योगच हे सगळ स्वप्नवत आहे.”