Sunday, July 7, 2024
Homeजिल्हाPune : सुरेंद्र पठारे फाऊंडेशनतर्फे शासन आपल्या दारी योजनेंतर्गत मोफत शासकीय दाखले वाटप

Pune : सुरेंद्र पठारे फाऊंडेशनतर्फे शासन आपल्या दारी योजनेंतर्गत मोफत शासकीय दाखले वाटप

Pune : सुरेंद्र पठारे फाऊंडेशन तर्फे शासन आपल्या दारी योजनेंतर्गत नागरिकांना मोफत शासकीय दाखले मिळवून देण्यासाठी चंदननगर येथे उपक्रमाचे आयोजन केले होते. २६ व २७ जून या कालावधीत पार पडलेल्या या उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी तब्बल ३४२९ नागरिकांना विविध शासकीय दाखले यावेळी प्राप्त करून देण्यात आले. यापूर्वीही सुरेंद्र पठारे फाऊंडेशनने येरवडा या ठिकाणी हाच उपक्रम राबवला; ज्यात ४३०२ नागरिकांना फायदा झाला. (Pune)

“शाळा-महाविद्यालये यांच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना तसेच त्यांच्या पालकांना व इतर नागरिकांना आपल्या विविध कामांसाठी किंवा एखाद्या योजनेचा लाभ घेण्यासाठी शासकीय दाखल्यांची गरज असते. तीच गरज लक्षात घेऊन शासन आपल्या दारी योजनेंतर्गत मोफत दाखले काढून देण्याचा उद्देश समोर ठेवून चंदननगर तसेच येरवडा भागात हे उपक्रम राबवले. अनेक नागरिकांना याचा नक्कीच फायदा झाला आहे. कागदपत्रे मिळाल्यानंतर अनेक नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी भेटी घेऊन आभारही मानले,” असे सुरेंद्र पठारे फाऊंडेशनचे अध्यक्ष सुरेंद्र पठारे यांनी सांगितले. (Pune)

नागरिकांनीदेखील या उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सुरेंद्र पठारे फाऊंडेशनचे व तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी कार्यालयाच्या सर्व अधिकारी वर्गाला धन्यवाद दिले. वडगावशेरी मतदारसंघाचे प्रथम आमदार बापूसाहेब पठारे यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले होते.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

बेकायदेशीर पब-बार, अमली पदार्थ विक्री करणाऱ्या दुकानांवर मोठी कारवाई

अहमदनगर एज्युकेशन सोसायटी अंतर्गत लिपिक पदाची मोठी भरती

मोठी बातमी : शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई संदर्भात सरकारचा मोठा निर्णय

विरोधी पक्षनेते राहुल गांधींना मिळणार अनेक अधिकार, मोदी सरकारची होणार अडचण !

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत तब्बल 17,727 जागांसाठी भरती सुरु

१ हजार ९१० आशा सेविकांचे मोबाईल सुविधेतून सक्षमीकरण

भारतीय हवाई दल अंतर्गत मोठी भरती

अमली पदार्थांशी संबंधित अवैध बांधकामांवर बुलडोझर फिरवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

मोठी बातमी : 18 व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी ओम बिर्ला यांची निवड

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय