Supreme Court : सर्वोच्च न्यायालयात सध्या इलेक्टोरल बाँड्स संदर्भात सुनावणी सुरू आहे. आज पुन्हा न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने स्टेट बँकेला (SBI) चांगलेच धारेवर धरले. तसेच इलेक्टोरल बाँड्सचे (Electoral Bonds) सर्व तपशीलउघड करण्याचे निर्देश दिले आहेत.
सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सोमवारी इलेक्टोरल बाँड्सवर सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील न्यायमूर्ती संजीव खन्ना, बीआर गवई, जेबी पार्डीवाला आणि मनोज मिश्रा यांचे घटनापीठा समोर ही सुनावणी पार पडली. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोख्यांबाबत काेणतीही माहिती लपवू नका असे म्हणत स्टेट बँक ऑफ इंडियाने संपूर्ण माहिती का दिली नाही? असा सवाल केला.
सर्वोच्च न्यायालयाने येत्या 21 मार्चला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्षांना प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितले. या प्रतिज्ञापत्रात हे सांगावे लागणार आहे की, एसबीआयने सर्व माहितीचा खुलासा केला आहे. तसेच निवडणूक रोखेसंदभांतील कोणतीही माहिती लपवलेली नाही, असेही प्रतिज्ञापत्र द्यावे लागणार आहे.
तसेच, SBI कडून सर्व तपशील मिळाल्यानंतर निवडणूक आयोगाने तत्काळ आपल्या वेबसाइटवर तपशील अपलोड करावा, असे सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) म्हटले आहे.
दरम्यान, एसबीआयच्या बाजूने असलेले वकील हरिश साळवे यांनी सुप्रीम कोर्टाला म्हटले की, आम्ही निवडणूक रोख्यांची सर्व माहिती देऊ. आम्ही आमच्याकडे कोणतीही माहिती लपवून ठेवणार नाही.
हे ही वाचा :
अजमेर मध्ये रेल्वेचा भीषण अपघात, ४ डबे रुळावरून घसरले रुळही उखडले
मोठी बातमी : कोल्हापुरात भीषण अपघात ट्रकने ४ मजुरांना चिरडले तर ८ गंभीर जखमी
मी पुन्हा आलो पण येताना दोन्ही पक्ष फोडूनच आलो देवेंद्र फडणवीस यांचे मोठे वक्तव्य
ब्रेकिंग : शिंदे गटाच्या आमदाराच्या गाडीवर हल्ला
धक्कादायक : पुण्यात दिवसाढवळ्या गोळीबार, एकाचा मृत्यू
Pune : भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था, पुणे अंतर्गत भरती
कळपातून उधळलेला बैल थेट कारमध्येच घुसला; नंदुरबारमधील घटना