Wednesday, December 25, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडविद्यार्थ्यांनी लुटला पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मितीचा आनंद

विद्यार्थ्यांनी लुटला पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मितीचा आनंद

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय, पेठ क्रमांक २५, निगडी प्राधिकरण येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी शाडू मातीतून गणेशमूर्ती निर्मितीची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. Students enjoyed the joy of creating an eco-friendly Ganesha idol

माजी नगरसेविका शर्मिला बाबर आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली पाटील यांनी आयोजित केलेल्या या उपक्रमात सुमारे सेहेचाळीस विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनविण्याचा आनंद लुटला. सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र बाबर यांनी उपक्रमाच्या संयोजनात सहकार्य केले. 

उपक्रमाचे हे चौथे वर्ष होते. कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी सहभागी विद्यार्थ्यांना त्यांनी निर्माण केलेल्या गणेशमूर्ती सप्रेम भेट म्हणून देण्यात आल्या.

संबंधित लेख

लोकप्रिय