Monday, December 23, 2024
HomeNewsहिरडा कारखाना सुरु करा - आमदार अतुल बेनके यांची मागणी

हिरडा कारखाना सुरु करा – आमदार अतुल बेनके यांची मागणी

जुन्नर : जुन्नर मतदारसंघातील आदिवासीबहुल भागात अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. या प्रश्नाबाबत पुरवणी मागणीच्या माध्यमातून आमदार अतुल बेनके यांनी सरकारला या परिस्थितीची जाणीव करून दिली व आदिवासी समाजाच्या उन्नती साठी हिरडा प्रकल्प कारखाना पुन्हा सुरु करण्याची मागणी केली आहे.

भात पिकानंतर हिरडा च्या माध्यमातून आदिवासी बांधवाना आर्थिक उत्पन्न मिळते. शबरी महामंडळाकडून होत असलेली हिरडा खरेदी प्रक्रिया थांबलेली असल्याने हिरडा खरेदीच्या माध्यमातून खासगी व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची मोठी लूट होत आहे. त्यासाठी ठोस धोरणे आखण्याची गरज असून ज्याद्वारे आदिवासी समाजाची उन्नती होईल.
त्याचप्रमाणे सहकारी तत्वावरील कुकडेश्वर आदिवासी हिरडा प्रकल्प कारखाना जुन्नर तालुक्यात उभा करण्यात आला परंतु सरकारच्या उदासीनतेमुळे हा कारखाना रखडला आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात हा कारखाना पुनरुज्जीवीत करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत बैठक होऊन सकारात्मक भूमिका घेण्यात आली. मात्र त्यानंतर आलेल्या नवीन सरकारच्या कारकिर्दीत हा प्रकल्प रखडला आहे. तो कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी अंमलबजावणी करावी, अशी मागणी बेनके यांनी विधिमंडळात बोलताना राज्य सरकारकडे केली.

Lic
संबंधित लेख

लोकप्रिय