Tuesday, April 22, 2025
---Advertisement---
---Advertisement---

एसटी प्रवास पुन्हा महागणार? आता नवीन कर लावण्याचा महामंडळाचा प्रस्ताव

मुंबई : राज्यातील सर्वसामान्य प्रवाशांसाठी महत्त्वाचा समजला जाणारा एसटी (ST) प्रवास आणखी महाग होण्याची शक्यता आहे. (ST bus fare hike) महाराष्ट्र राज्य महामार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) एसटी बसच्या तिकिटांवर ‘स्वच्छता कर’ (Cleanliness Surcharge) लावण्याचा प्रस्ताव सादर केला असून, लवकरच यावर निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

---Advertisement---

परिवहन विभागाकडून महामंडळाचे अध्यक्ष आणि परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या समोर हा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावानुसार, एसटी तिकिटावर ‘स्वच्छता अधिभार’ आकारण्यात येणार आहे. (हेही वाचा – बारावीच्या विद्यार्थ्यांना निकालाचे वेध ; वाचा काय आहेत नवीन अपडेट)

प्रवाशांच्या खिशाला बसणार फटका | ST bus fare hike

राज्यभर एसटीच्या तिकीट दरात आधीच वाढ झाली आहे. २५ जानेवारीपासून महामंडळाने सर्व प्रकारच्या सेवांमध्ये सरासरी १४.९५ टक्के भाडेवाढ लागू केली होती. यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती. मात्र जनतेच्या तीव्र विरोधानंतरही ही दरवाढ मागे घेण्यात आली नव्हती. आता पुन्हा स्वच्छता कर लावल्यावर प्रवाशांच्या खिशावर भार पडणार आहे. राज्यभरात दररोज लाखो प्रवासी एसटीचा वापर करत असल्याने, त्यांच्यावर या निर्णयाचा थेट परिणाम होणार आहे. (हेही वाचा – महाराष्ट्रातील एका शेतकऱ्याला एका झाडाने रात्रीतून केले करोडपती)

---Advertisement---

प्रवासी घटल्याने उत्पन्नावर परिणाम

गेल्या काही महिन्यांपासून एसटी प्रवाशांच्या संख्येत घट झाली आहे. या घटलेल्या प्रवासामुळे महामंडळाच्या उत्पन्नावरही परिणाम झाला आहे. परिणामी, महसूल वाढवण्यासाठी एसटी प्रशासन विविध उपाययोजना करत असून, त्याचाच एक भाग म्हणून ‘स्वच्छता कर’ प्रस्तावित केला गेला आहे.  (हेही वाचा – धक्कादायक : दोन मित्रांची एकाच झाडाच्या फांदीला गळफास घेत आत्महत्या)

सध्या हा प्रस्ताव अंतिम निर्णयासाठी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या विचाराधीन असून, तो मंजूर झाल्यास एसटी प्रवास अधिक महाग होणार आहे.  (हेही वाचा – ब्रेकिंग : ‘ईव्हीएम हॅक करून निकाल बदलता येतो’, अमेरिकेच्या गुप्तचर संचालक तुलसी गबार्ड)

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles