Saturday, December 21, 2024
Homeताज्या बातम्याST Bus Strike : गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप

ST Bus Strike : गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप

ST Bus Strike : गणेशोत्सवाच्या तोंडावर, महाराष्ट्र राज्य परिवहन (एसटी) कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारला आहे, ज्यामुळे राज्यभरात बस सेवांवर मोठा परिणाम झाला आहे. पुणे, मुंबईसारख्या ठिकाणी नोकरीसाठी आलेले अनेक लोक आणि विद्यार्थी, जे गणेशोत्सवाच्या काळात त्यांच्या गावी परतण्यासाठी एसटी बसचा वापर करतात, त्यांना या संपामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

एसटी कर्मचारी संघटनांनी एस टी प्रवासी सेवेचे खाजगीकरण रद्द करा. कर्मचाऱ्यांना ओपीडी आय पीडी कॅशलेस आरोग्यविमा सुरू करा. जुन्या बसेस रद्द करून महामंडळाच्या मालकीच्या बसेस नव्याने खरेदी करा. एस टी स्थानकावर प्रवाशी आणि कर्मचाऱ्यांसाठी अद्यावत विश्रांती गृहे सुरू करा. एसटी कर्मचाऱ्यांनाही सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे वेतन द्या. एस टी चे वेळापत्रक तंतोतंत पाळा. निवृत्ती वेतन विषयक अडचणी दूर करा. आदी मागण्या करण्यात आल्या आहे. अन्यथा आंदोलन बेमुदत चालू ठेवण्याचा इशारा दिला आहे. (ST Bus Strike)

संपामुळे पुणे विभागातील ९०० बसेसपैकी सुमारे ४५० बसेसची सेवा ठप्प झाली आहे. शिवाजीनगर, वल्लभनगर, भोर, सासवड, बारामती या डेपोंवर बस सेवा प्रभावित झाली असून प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. राज्यभरात २५१ डेपोंपैकी ५८ डेपो पूर्णपणे बंद आहेत, तर उर्वरित डेपो अंशतः उघडे आहेत.

एसटी कर्मचाऱ्यांचे हे आंदोलन गणेशोत्सवाच्या तोंडावर आल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. सरकारने लवकरात लवकर यावर निर्णय घेऊन प्रवाशांच्या अडचणींना तोडगा काढावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मी महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेची माफी मागतो – अजित पवार

मोठी बातमी : ‘म्हाडा’च्या ३७० सदनिकांच्या विक्री किंमतीत १० ते २५ टक्क्यांपर्यंत कपात

शिवरायांचा पुतळा कोसळण्याची कारणे शोधण्यासाठी नौदल-राज्य शासनाची संयुक्त तांत्रिक समिती

मोठी बातमी : राजकोट किल्ल्यावर मोठा राडा, शिवरायांच्या पुतळ्या राजकारण तापले

“घरात खेचून एकेकाला रात्रभर मारून टाकेन” नारायण राणे यांची जीवे मारण्याची धमकी

Telegram : टेलिग्रामवर भारतात बंदी येणार ? वाचा काय आहे प्रकरण !

शासकीय, निमशासकीय विभागात हजारो विविध पदांसाठी भरती, वाचा एका क्लिकवर !

संबंधित लेख

लोकप्रिय