Monday, December 23, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडकामगार नेते जीवन येळवंडे दैनिक लोकमत चा विशेष पुरस्कार !

कामगार नेते जीवन येळवंडे दैनिक लोकमत चा विशेष पुरस्कार !

पिंपरी चिंचवड : खेड तालुक्यातील चाकण, तळेगाव ई औद्योगिक क्षेत्रात कामगार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष जीवन येळवंडे यांना दैनिक लोकमत चा “लोकमत आचिव्हर्स अवॉर्ड 2022 पुरस्कार” प्रदान करण्यात आला.

राज्यमंत्री दत्ता भरणे, चित्रपट अभिनेते स्वप्नील जोशी, महापौर मुरलीधर मोहळ, लोकमत समूह संपादक विजय बाविस्कर, संपादक संजय आवटी यांच्या हस्ते  गुणवंत कामगार पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

आरोग्य सल्ला : रणरणत्या उन्हात अशी घ्या त्वचेची काळजी !

जीवन येळवंडे हे खेड तालुक्यातील मोई गावचे रहिवासी आहेत. सुरवातीला त्यांनी पिंपरी चिंचवड शहरातील कंपन्यांमध्ये कंत्राटी कामगार म्हणून काम केले. त्यानंतर चाकण औद्योगिक वसाहत सुरू झाली. चाकण येथील केहीन फाय या आंतरराष्ट्रीय कंपनीत कंत्राटी कामगार म्हणून नोकरी सुरू केली. त्याच कंपनीत त्यांनी अंतर्गत कामगार संघटनेची स्थापना केली. 

त्यानंतर चाकण औदयोगिक वसाहतीतील असंघटित कंत्राटी कामगारांना किमान वेतन, सामाजिक सुरक्षा, सुरक्षितता साधने, चाकण मध्ये कामगारांसाठी प्रवासी वाहतूक व्यवस्था इ विविध मागण्यांसाठी स्वतःची स्वतंत्र स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटना स्थापन केली.

मोठी बातमी : राज्यातील “या” जिल्ह्यांना पुढील ४ दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा

संघटनेच्या माध्यमातून कोरोना महामारीच्या काळात स्थलांतरित आणि इतर सर्व अडचणीत असलेल्या सर्व कामगारांना दररोज ताज्या अन्नाची पाकिटे, किराणा किट, औषधोपचार इ सर्व मदत केली. 

चाकण औद्योगिक वसाहतीतील कामगार आणि उद्योग जगताच्या समस्या शासन स्तरावर सोडवण्यासाठी आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी विशेष प्रयत्न केले. स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटनेच्या एकूण 22 शाखा चाकण, तळेगाव, रांजणगाव, नाशिक येथे कार्यरत आहेत.

ब्रेकिंग : महागाईचा भडका सुरूच, पेट्रोल 115 पार, तर डिझेलची शंभरी पार

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मध्ये विविध जागांसाठी भरती

आरोग्यवार्ता : कडक उन्हाळ्यात कसे टाळावे आजार, वाचा !

संबंधित लेख

लोकप्रिय