Friday, June 13, 2025
---Advertisement---
---Advertisement---

आरोग्य सल्ला : रणरणत्या उन्हात अशी घ्या त्वचेची काळजी !

---Advertisement---

---Advertisement---

आपण सर्व जाणतो की संपुर्ण देशात तीव्र उन्हाळ्याची लाट आहे. शास्त्रज्ञांनीही त्यास दुजोरा दिला आहे. आपणही सर्व सध्या उन्हाची काहिली सोसत आहोत, त्यामुळे ते वेगळे सांगायला नको. उन्हाळ्यामध्ये आपली त्वचा हे उत्सर्जनाचे (Excretion) काम जास्त करते. म्हणजे शरीरातील अनावश्यक द्रव्य बाहेर टाकण्याचे काम  उन्हाळ्यामध्ये जास्त करावे लागते. त्यामुळे त्वचेची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे. जेणेकरून त्वचेची, शरीराची व्यवस्थित निगा राखली जाईल.

आरोग्यवार्ता : कडक उन्हाळ्यात कसे टाळावे आजार, वाचा !

त्वचेची काळजी कशी घ्याल !

१) उन्हाळ्यामध्ये भरपूर पाणी पिणे त्वचा तेलदार राहण्यासाठी मदत करते. सतत व थोडे थोडे पाणी पिणे महत्वाचे आहे. 

२) उन्हाळ्यात उष्ण व जड अन्न न खाता मुख्यतः द्रव पदार्थ जसे की पाणीयुक्त फळे कलिंगड, काकडी, लिंबू, खरबूज, टरबुज, टोमॅटो, द्राक्ष इत्यादींचे सेवण करावे. किंवा लघु आहारात ज्वारीची भाकरी, मुग खिचडी इत्यादी. 

३) उन्हात जाणे शक्यतो टाळावे, गेल्यास संपूर्ण चेहरा अंग पांढऱ्या कपड्याने झाकले जातील अशा पद्धतीने कपडे परिधान करावित. 

४) उन्हातून आल्यावर तोंड हातपाय धुणे (साबणाने) धुणे जेणेकरून घर्मरंर्धे मोकळी होतील व त्वचेचे उत्सर्जनाचे काम व्यवस्थित होईल. 

५) दिवसातून 3 – 4 वेळा तोंड हात पाय धुवावे, शक्य झाल्यास अंघोळ करावी. किंवा रात्री झोपण्या पूर्वी अंघोळ करावी. बाहेरून उन्हातून घरी आल्यावर अंघोळ किंवा हात पाय तोंड धुवावे.

६) चेहऱ्यावर किंवा अंघोळ करतेवेळी संपुर्ण अंगावर चंदन, अंगरू, वाळा आदीचा लेप करावा.

७) जास्त घाम येणाऱ्या व हवा कमी लागणाऱ्या, मुख्यतः कमरेखालील ठिकाणची योग्य काळजी घ्यावी. जास्त घाम येत असेल तर अंतर्वस्त्रे दिवसातून २/३ वेळा बदलावी. संपूर्ण अंघोळ करणे. आदी उपाय करावे

८) चक्कर, भोवळ, उलटी, मळमळ अशक्तपणा त्वचेची  आग, खाज  होणे अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

---Advertisement---

आरोग्य सल्ला : डॉ. दयानंद गायकवाड,

गायकवाड क्लिनिक, महाबरे कॉम्प्लेक्स, नवीन ST स्टँड जवळ, जुन्नर 

संपर्क : 9922855174


WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles