जोधपूर : दिव्यांग लोकांचे जीवन सुकर बनावे यासाठी संशोधक अनेक प्रयत्न करीत असतात. आता भारतीय संशोधकांनी स्वर-बाधित लोकांसाठी ‘टॉकिंग ग्लोव्ज’ म्हणजेच ‘बोलणारे हातमोजे’ विकसित केले आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) आणि मशिन लर्निंग (एमएल) वर आधारित हे हातमोजे आहेत. मूक आणि सामान्य लोकांमधील सुगम संवादासाठी हे मोजे एक माध्यम बनू शकतील असे संशोधकांना वाटते.
मुली रात्री एकांतात मोबाइलवर काय सर्च करतात ? या चार गोष्टी आहेत
आयआयटी जोधपूर आणि जोधपूरच्याच ‘एम्स’मधील संशोधकांनी हे उपकरण विकसित केले आहे. हे उपकरण हाताच्या संकेतांना मजकूर किंवा आधी रेकॉर्ड केलेल्या आवाजांमध्ये रूपांतरित करू शकते. त्यामुळे मूक व्यक्तींना आपले म्हणणे इतरांना सांगणे सहजशक्य होऊ शकेल. या उपकरणाला पेटंटही मिळालेले आहे.
बापरे! आता मानवी मेंदूत बसणार चिप !
आयआयटी जोधपूरच्या ‘कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग’ विभागाचे संशोधक प्रा. सुमित कालरा तसेच डॉ. अर्पित खंडेलवाल तसेच एम्स जोधपूरचे संशोधक डॉ. नितीन प्रकाश नायर, डॉ. अमित गोयल आणि डॉ. अभिनव दीक्षित यांनी हे उपकरण विकसित केले. प्रा. कालरा यांनी सांगितले की हे उपकरण लोकांना सध्याच्या वैश्विक युगात कोणत्याही अडथळ्याशिवाय संवाद साधण्यास मदत करील. त्याचा उपयोग कसा करायचा हे एकदा शिकून घेतले की असा संवाद सुरळीत सुरू होऊ शकतो. या उपकरणाला व्यक्तीच्या मूळ आवाजासारखा आवाज निर्माण करण्यासही अनुकूल केले जाऊ शकते.
नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालयात विविध पदांच्या ८८ जागा ! आजच अर्ज करा!