Allu Arjun Arrested : साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि ‘पुष्पा 2’ चित्रपट सध्या चर्चेत आहेत. मात्र, या चर्चेने आता वेगळे वळण घेतले आहे. हैदराबादमधील संध्या थिएटरमध्ये ‘पुष्पा 2’ चित्रपटाच्या प्रीमिअर शोदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत एका 35 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याप्रकरणी अल्लू अर्जुनला चिक्कडपल्ली पोलिसांनी अटक केली आहे.
‘पुष्पा 2’चा प्रीमिअर शो संध्या थिएटरमध्ये 4 डिसेंबर 2024 रोजी आयोजित करण्यात आला होता. अल्लू अर्जुनला पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. मात्र, या गर्दीत चेंगराचेंगरी झाली आणि श्वास गुदमरल्यामुळे एका महिलेचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मृत महिलेच्या कुटुंबीयांनी थेट अल्लू अर्जुन आणि थिएटर व्यवस्थापनाविरोधात तक्रार दाखल केली होती.
चेंगराचेंगरी प्रकरणी चिक्कडपल्ली पोलिसांनी अल्लू अर्जुन, थिएटर व्यवस्थापन आणि सुरक्षा टीमविरोधात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 105 आणि 118 (1) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी थिएटर मालक, वरिष्ठ व्यवस्थापक आणि बाल्कनी प्रभारी अशा तिघांनाही अटक केली आहे.
या प्रकरणानंतर अल्लू अर्जुनने तेलंगणा उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्याने दाखल केलेल्या याचिकेत एफआयआर रद्द करण्याची मागणी केली होती. तसेच, याचिका निकाली निघेपर्यंत अटकेसह पुढील सर्व कारवाईला स्थगिती देण्याचे आवाहनही केले होते. मात्र, न्यायालयाच्या निर्णयानंतर पोलिसांनी कारवाई करत त्याला अटक केली आहे.
Allu Arjun
हे ही वाचा :
मोठी बातमी : सर्वात कमी वयात डी. गुकेश ने वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप जिंकत रचला इतिहास
Fire : तामिळनाडूत हॉस्पिटलला लागलेल्या आगीत 7 ठार
महाराष्ट्र राज्य लॉटरी नोव्हेंबर २०२४ चा भव्य सोडतीचा निकाल जाहीर
धक्कादायक : पत्नीच्या छळाला कंटाळून इंजिनियरची आत्महत्या, तब्बल 24 पानांची लिहली सुसाईड नोट
विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी : उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कहर, शाळांच्या वेळेत बदल
मोठी बातमी : ‘वेलकम’ सिनेमातील प्रसिद्ध अभिनेत्याचे अपहरण, खंडणीसाठी 12 तास टॉर्चर
ब्रेकिंग : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या विविध परिक्षांचा निकाल जाहीर