Solapur : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सोलापूर अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष, सोलापूर आणि महात्मा फुले समाज मंडळ, करमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने “बालविवाह मुक्त भारत अभियान” आधारित एक दिवसीय (28 नोव्हेंबर 2024) प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव व न्यायाधीश देवर्षी, रमेश काटकर जिल्हा महिला बाल व विकास अधिकारी, बाल न्याय मंडळाच्या अध्यक्षा बिराजदार, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी रेश्मा गायकवाड, व महात्मा फुले समाज मंडळाचे अध्यक्ष प्रमोद झिंजाडे यांच्या हस्ते झाले. सुरुवातीला उपस्थित सर्वांना बालविवाह मुक्तीसाठी शपथ देण्यात आले. उद्घाटन प्रसंगी देवर्षी यांनी सामाजिक व कौंटुबिक स्तरावरील अडचणी समजून घेऊन त्यावर उपाय शोधले पाहिजे त्याशिवाय बालविवाह थांबविता येणार नाही असे प्रतिपादन केले.
पुढे बालविवाह रोखण्यासाठी जिल्हयातील सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याची आवश्यकता आहे व बालविवाह बाबतीत जिल्हा चौथ्या क्रमांकावर आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी सर्वांनी प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजे असे मत रमेश काटकर यांनी व्यक्त केले.
ऍड. लक्ष्मण मारडकर यांनी बाल न्याय (काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 आणि ऍड. सरोजनी तमशेट्टी यांनी बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 या विषयावर उपस्थितींना प्रथम सत्रात मार्गदर्शन केले.
दुपारच्या सत्रात ऍड. सुवर्णा कोकरे यांनी बालविवाह प्रतिबंधक अधिकारी व सहाय्यक यांची भूमिका तसेच प्रसाद बैलकुरमठ यांनी ग्राम बाल संरक्षण समिती व वार्ड बाल संरक्षण समिती ह्या विषयावर प्रशिक्षण दिले. पुढे चाईल्ड लाईनचे जिल्हा समन्वयक आनंद ढेपे यांनी १०९८ वर येणाऱ्या कॉलची माहिती आणि प्रक्रिया प्रशिक्षणार्थींना दिले.
सूत्रसंचालन चाईल्ड लाईन समुपदेशक मल्लिनाथ तमशेट्टी यांनी केले तर आभार चाईल्ड लाईन जिल्हा सुपरवायजर अनोज कदम यांनी मानले. कार्यक्रमात युनिसेफ एस. बी. सी. 3 चे वरिष्ठ समन्वयक सिद्धाराम गायकवाड, महात्मा फुले समाज मंडळाच्या जिल्हा समन्वयक रजनीगंधा गायकवाड, तालुका समन्वयक सुजाता कांबळे व सीमा कांबळे यांची उपस्थिती होती. सदर प्रशिक्षणात ग्रामसेवक, चाईल्ड लाईन टीम, मुख्य सेविका, अंगणवाडी सेविका तसेच सामाजिक संस्थांचा सहभाग होता.
Solapur
हे ही वाचा :
मोठी बातमी : माजी मंत्री मधुकर पिचड यांचे निधन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संक्षिप्त परिचय
95 विधानसभा मतदारसंघात EVM-VVPAT मशिन्सच्या तपासणीसाठी 104 अर्ज प्राप्त
मोठी बातमी : देवेंद्र फडणवीस यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ
नेक्स्ट जेनरेशन बजाज चेतक या महिन्यात लाँच होणार, वाचा काय असणार किंमत