Friday, November 22, 2024
Homeजिल्हा…तर त्याचे प्रेत महापालिकेत आणतो – कॉ.आडम मास्तर

…तर त्याचे प्रेत महापालिकेत आणतो – कॉ.आडम मास्तर

सोलापूर : सोलापूर परिवहन उपक्रम महापालिका अंतर्गत असून ते पालिकेचे अविभाज्य अंग आहे. अशा या सोलापूर महानगरपालिकेचे आजमितीला 49 कर्मचारी मयत झाले आहेत. त्यांची कुटुंबे उघड्यावर आली आहेत. ज्यांनी आयुष्यभर महापालिकेची सेवा बजावली अशा कर्मचाऱ्याला महापालिकेने काय दिले? पालिकेच्या ढिसाळ आणि भोंगळ कारभारामुळे परिवहन कर्मचारी वनवास भोगत आहेत. त्यांच्या कुटुंबाची वाताहत झाली आहे. याला महापालिकाच जबाबदार आहे असा घणाघाती आरोप मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी केला. या पुढे जर परिवहन कर्मचारी दगावला तर त्याचे प्रेत महापालिकेत आणतो, असा इशाराही यावेळी दिला.

लाल बावटा सोलापूर महानगरपालिका कामगार युनियन सिटू च्या वतीने सोमवार 26 जून रोजी सोलापूर महानगरपालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर व माजी नगरसेवक व्यंकटेश कोंगारी याचा नेतृत्वाखाली मोर्चाची सुरुवात झाली त्यांनतर डफरीन चौक मार्गे कामटे रसपान गृह सोलापूर महानगरपालिकेवर लाल झेंडे घेऊन जोरदार घोषणाबाजी करत कर्मचारी धडकले.

यावेळी माजी नगरसेविका कॉ. व्यंकटेश कोंगारी व माजी नगरसेविका कामिनी आडम यांच्या नेतृत्वाखाली नगर अभियंता संदीप कारंजे यांना शिष्टमंडळाद्वारा निवेदन देण्यात आले आहे. या शिष्टमंडळात तौफिक शेख, सिकंदर जमादार, सुरेश बागलकोटे, महिबूब शेख, अय्युब शेख, देविदास गायकवाड, रमेश गवळी, हंजगिरी आदी उपस्थित होते.

यावेळी निवेदनात म्हटले आहे की, लाल बावटा महानगरपालिका कामगार युनियन (सिटू) सोलापूर यांच्याकडून अनेकवेळा परिवहन उपक्रमाकडील सन २००९ ते २०१५ कालावधीमध्ये कायम झालेल्या व कायमसेवा पूर्ण करून निवृत्त झालेल्या सेवकांना निवृत्ती वेतन देण्याबाबत व कार्यरत कर्मचाऱ्यांना ६ वेतन आयोगाचे थकीत ६५ टक्के महागाई भत्ता लागू करणे. तसेच मनपा कर्मचाऱ्यांप्रमाणे परिवहन कर्मचाऱ्यांना ७ वे वेतन आयोग लागू करण्याबाबत अनेकवेळा निवेदने देऊन सातत्याने पाठपुरावा करण्यात आले आहे.

दि. १९/०६/२०२३ रोजी परिवहन कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन, ७ वे वेतन आयोग लागू करण्याबाबत पुनःश निवेदन देण्यात आले असता संदर्भ क्र २ ने मा. परिवहन व्यवस्थापन, सोमपा परिवहन उपक्रम यांनी परिवहन उपक्रमाकडे कार्यरत असलेल्या सेवकांचे दरमहाचे वेतन व सेवा निवृत्त झालेल्या सेवकांचे निवृत्ती वेतन महानगरपालिकेकडून अदा करण्यात येत आहे. असे नमूद करून आजला परिवहन उपक्रमाची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट असल्याने महाराष्ट्र नागरी सेवा १९८२ अन्वये निवृत्ती योजना लागू करणे व परिवहन उपक्रमाकडील कर्मचाऱ्यांना ७ वे वेतन आयोग लागू करणे शक्य नाही, परिवहन उपक्रमाची आर्थिक स्थिती सुधारेल त्यावेळी प्रामुख्याने याबाबत विचार केले जाईल असे कळविले आहे.

आपले संदर्भीय क्र २ चे कार्यालयीन पत्रामध्ये नमूद माहिती व उत्तराने मे. उच्च न्यायालय, मुंबई, मे. औद्योगिक न्यायालय सोलापूर यांनी सोमपा परिवहन उपक्रमाकडील सेवकांचे फिर्यादीमध्ये महाराष्ट्र नागरीसेवा निवृत्ती वेतन अधिनियम १९८२ प्रमाणे निवृत्ती वेतन देण्याबाबत आदेश दिलेला आहे. सदर आदेशाची अंमलबजावणी आपल्याकडून होत नसल्याने मे. न्यायालयाचे आदेशाचे अवमान होत आहे.

सोमपा परिवहन उपक्रमाकडील ५९६ सेवानिवृत्त सेवकांना निवृत्त वेतन अदा करण्यासाठी मनपाचे अंदाजपत्रक ‘अ’ मध्ये रक्कम रुपये ७.५० कोटी तरतूद करण्यात येऊन निवृत्ती वेतन दिले जात आहे. त्याचप्रमाणे सन २०१० ते २०२३ दरम्यान सेवा निवृत्त झालेल्या २१७ सेवक व पुढे सेवानिवृत्त होणाऱ्या परिवहन उपक्रमाकडील सेवकांना पेन्शन योजना लागू करावयाचे झाल्यास मासिक १३ लाख व प्रतिवर्षी १.५० कोटी इतकी रक्कम अपेक्षित असल्याचे कळविण्यात आलेले आहे. आपणास विनंती कि, मनपा अंदाजपत्रक ‘अ’ मधील परिवहन उपक्रमाकडील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना करण्यात आलेल्या तरतुदीमध्ये वाढीव रक्कमेची तरतूद करून घेऊन निवृत्त वेतन कर्मचाऱ्यांना देणे आवश्यक असताना परिवहन उपक्रमाचे आर्थिक स्थितीचे कारण दाखवून सेवानिवृत्त सेवकांना पेन्शनपासून वंचित ठेवून अन्याय केला जात आहे.

परिवहन उपक्रम हा महानगरपालिकेचा भाग असून परिवहन उपक्रमाकडील कर्मचाऱ्यांचे वेतन, महागाई भत्ता व निवृत्ती वेतन द्यावयाची जबाबदारी महानगरपालिकेची असून यास्तव पुरेशी तरतूद करून घेऊन परिवहन कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन, थकीत महागाई भत्ता व ७ वा वेतन आयोग देणे आवश्यक व जरुरीचे आहे.

परिवहन उपक्रमाकडील सन २००९ ते २०१५ या कालावधीमध्ये कायम होऊन निवृत्त झालेल्या सर्व सेवकांना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन १९८२ नुसार व मे. न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे निवृत्ती वेतन योजना लागू करून निवृत्ती वेतन अदा करण्यात यावे. तसेच परिवहन उपक्रमाकडील कर्मचाऱ्यांना १९ डिसेंबर १९७७ चे कामगार युनियनशी असलेल्या कराराप्रमाणे ७ वा वेतन आयोग लागू करून न्याय द्यावे, अशी विनंतीही यावेळी करण्यात आली.

यावेळी माजी नगरसेविका कामिनी आडम, कॉ.सिद्धप्पा कलशेट्टी, व्यंकटेश कोंगारी, तौफिक शेख, अँड.अनिल वासम आदी उपस्थित होते.

हे ही वाचा :

पुणे : इंजिनिअरिंग कॉलेज विद्यार्थी सहकारी ग्राहक संस्था अंतर्गत विविध पदांची भरती

महाराष्ट्र अग्निशमन सेवा (MFS) प्रवेश प्रक्रिया – 2023-24; आजच करा अर्ज

UPSC : केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांची भरती

सातारा येथे ‘अंगणवाडी मदतनीस’ पदांची नवीन भरती सुरू; आजच करा अर्ज

DRDO प्रगत प्रणाली प्रयोगशाळा अंतर्गत विविध पदांची भरती

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ अंतर्गत भरती; आजच करा अर्ज

उल्हासनगर महानगरपालिका अंतर्गत स्टाफ नर्स, मायक्रोबायोलॉजिस्ट व अन्य पदांसाठी भरती

संबंधित लेख

लोकप्रिय