Thursday, April 3, 2025
---Advertisement---
---Advertisement---

आदिवासी मजुरावर लघुशंका : भाजप नेत्यास अटक ; घरावर बुलडोझर

भोपाळ : आदिवासी मजूर तरुणावर भाजप नेत्याने लघवी केल्यामुळे देशभरात मोठी खळबळ उडाली आहे. ही संतापजनक घटना मध्य प्रदेशातील सिधी जिल्ह्यातील कुबरी गावात घडली होती. या प्रकरणी प्रवेश शुक्ला या भाजप नेत्याला पोलिसांनी तातडीने अटक केली आहे. या आरोपींची चौकशी सुरू असून लवकरच कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल अशी माहिती सिद्धीच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक अंजुलता पटले यांनी दिली आहे.

---Advertisement---


प्रवेश शुक्लाने आदिवासी तरुणाच्या चेहऱ्यावर लघवी केल्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या आरोपीवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पोलिसांनी आरोपीवर भारतीय दंड संहितेच्या कलम 294, 504 आणि अनुसूचित जाती जनजाती संरक्षक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

भाजपशी संबंधित प्रवेश शुक्ला याला अटक केल्यानंतर याच्या बेकायदेशीर निवासस्थानावर आता प्रशासनाकडून बुलडोझर चालवण्यात आला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने हा व्हिडिओ शेअर केला आहे. या संतप्त घटनेचा काँग्रेस सह विरोधी पक्षांनी निषेध केला आहे.

लोणावळा व्हिडिओ : भुशी डॅम ओव्हरफ्लो – चला पर्यटन करू

कोट्यावधी रुपये खर्च करूनही पवना इंद्रायणीला जलपर्णीचा विळखा

महाराष्ट्र : वैफल्यग्रस्त मोदी सरकारने केली लोकशाहीची निर्घृण हत्या

---Advertisement---
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles