Thursday, September 19, 2024
HomeNewsतळवडे, रुपीनगरमध्ये श्रीकृष्ण जन्मोत्सव

तळवडे, रुपीनगरमध्ये श्रीकृष्ण जन्मोत्सव

पिंपरी चिंचवड : तळवडे, रुपीनगरमधील श्रीकृष्ण मंदिर येथे श्रीकृष्ण सेवा ट्रस्ट यांच्या सहकार्याने वार्षिक कृष्णजन्माष्टमी उत्सव साजरा करण्यात आला. पारंपरिकरित्या दोन दिवसीय उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. जन्माष्टमीच्या दिवशी पहाटे मंगल आरती, त्यांनतर श्रीमद भागवत पारायण, संगीत भजन, हरिपाठ, कृष्णमूर्ती अभिषेक इ. कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. रात्री १२ वाजता परंपरेनुसार श्रीकृष्णजन्म व पाळणा साजरा करण्यात आला.

गोपाळकाल्याच्या दिवशी पहाटे आरती, त्यांनतर कीर्तनसेवा सादर करण्यात आली. सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. संध्याकाळी बालगोपाळांनी दहीहंडी फोडून आनंद लुटला.

सदर कार्यक्रमासाठी ट्रस्टचे अध्यक्ष हनुमंत जाधव, सेक्रेटरी कॅप्टन बाळाराम उत्तेकर, खजिनदार कॅप्टन बळीराम गोळे, नथुराम शेलार, बापू जाधव, किशोर मिटकरी, नामदेव पवार, सहदेव जगताप, रोशन साळुंखे, मधुकर सोनगिरे, नरेंद्र गोळे, रविंद्र सोनगिरे, हंबेराव पाटिल, सचिन उत्तेकर, विजय उत्तेकर, आशिष मोटे, चंद्रकांत भालेकर आणि त्यांचे इतर सर्व सहकारी यांनी परिश्रम घेतले.

प्रसंगी शिवयोद्धा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष अमोल भालेकर, आशाताई भालेकर, माजी नगरसेवक प्रविण भालेकर, पंकज भालेकर, शांताराम भालेकर, धनंजय वर्णेकर, पोर्णिमा सोनवणे, शरद भालेकर, विशाल मानकरी, दादा नरळे, संदिप जाधव, शिरिष उत्तेकर आदीसह उपस्थित होते.

– क्रांतिकुमार कडुलकर

Lic Kanya Yojana
संबंधित लेख

लोकप्रिय