जुन्नर : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उच्छिल येथे इयत्ता पहिली ते सातवीतील सर्व मुलांना श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्ताने गोपाळकाला उत्सव अतिशय मोठ्या उत्साहात आनंदाने साजरा केला याचा आनंद शाळेतील सर्व मुलांना नाचून गाऊन आनंद लुटत मनोरंजन केले. याप्रसंगी शाळेतील मुले व मुली पांरपारिक पोशाखात परिधान करून त्यांनाही आनंद लुटला तर ढोल ताश्याच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली व नंतर मटका फोडून आनंदोत्सव साजरा केला.
याप्रसंगी गोपाळकाला याविषयी माहिती दिली. या निमित्ताने उपस्थित शाळेचे मुख्याध्यापक अन्वर सय्यद, पदवीधर शिक्षक सुभाष मोहरे, सहशिक्षिका स्मिता ढोबळे, लिलावती नांगरे व आरती मोहरे होत्या.