Shirur Loksabha Election 2024 : देशात आणि राज्यात लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे. राज्यात महाविकास आघाडी आणि महायुती लढत होणार असून दोन्हीकडे नाराजी नाट्य सुरू आहे. अनेक पदाधिकारी पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जात आहेत. अशातच भाजपाचे नेते आणि खेड आळंदी विधानसभेचे समन्वयक अतुल देशमुख पक्षाला रामराम केला. Loksabha
या राजीनाम्यानंतर आढळराव पाटलांच्या उमेदवारीमुळे भाजपातील नाराजी चव्हाट्यावर आली आहे. तर अतुल देशमुख यांचा राजीनामा भाजपासाठी मोठा धक्का असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, शिरुर लोकसभेसाठी शिवाजी आढळराव पाटीलांच्या (Shivajirao Adhalrao Patil) यांना उमेदवारी दिल्यानंतर भाजपात (BJP) नाराजी पाहायला मिळत आहे. भाजपाचे नेते आणि खेड आळंदी विधानसभेचे समन्वयक अतुल देशमुख भाजपाचा राजीनामा दिला आहे.
विशेष म्हणजे त्यांनी भाजपाच्या सर्व पदांचा राजीनामा देऊन आम्हीच तुम्हाला सोडतोय अशी थेट भुमिका घेत अतुल देशमुख यांनी भाजपला रामराम ठोकला. भाजपाने विकासाबाबत विश्वासात घेतले नाही. ज्या पक्षात काम करतो तेच आपला विचार करत नसल्याची खंत व्यक्त करत भाजपाला सोडण्याचे जाहीर केले आहे. तसेच आपल्या पदाचा राजीनामाही प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सुपूर्त केला आहे.
अतुल देशमुख कोणती भूमिका घेणार ?
दरम्यान, भारतीय जनता पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर अतुल देशमुख यांनी कार्यकर्त्यांना विश्वासात घेण्यासाठी तातडीची बैठक बोलावली आहे. अतुल देशमुख हे उत्तर पुणे जिल्ह्यातील भाजपाचे मोठे नेतृत्व आहे. त्यामुळे ऐन लोकसभेच्या रणधुमाळीत त्यांनी पक्षाला रामराम ठोकल्याने भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. आता भाजपातून बाहेर पडल्यानंतर अतुल देशमुख काय भुमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


हे ही वाचा :
मोठी बातमी : शरद पवार गटाला मोठा धक्का बसणार, ‘हा’ बडा नेता भाजपच्या वाटेवर
मोठी बातमी : एकनाथ खडसे यांची लवकरच भाजपमध्ये घर वापसी होणार
मोठी बातमी : कल्याण लोकसभेसाठी देवेंद्र फडणवीसांकडून उमेदवार जाहीर
वेळ पडल्यास उमेदवारांना हॅलिकॉफ्टरने आणू, हसन मुश्रीफ यांचे मोठे विधान
मोठी बातमी : श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीवर देवेंद्र फडणवीस यांचे मोठे विधान
अभिनेत्री कंगना रणौत झाली होती बारावीत नापास, आज भाजपची लोकसभेची उमेदवार
कंगना राणौतने भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून घेतले ‘यांचे’ नाव, लोक करताहेत ट्रोल
आरटीई कायद्यातील बदलाच्या आदेशाची प्रत जाळून पालकांनी केला निषेध!