Thursday, May 22, 2025
---Advertisement---
---Advertisement---

Balaji Kalyankar : आमदार बालाजी कल्याणकर यांच्या गाडीवर हल्ला

Balaji Kalyankar : केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहिर केल्या असून सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्मुला देखील जवळपास निच्छित झाला आहे. असे असताना नांदेडमधून एक मोठी धक्कादायक घटना घडली आहे. शिवसेना (शिंदे गट) चे आमदार बालाजी कल्याणकर (Balaji Kalyankar) यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे.

---Advertisement---

नांदेड उत्तर मतदरासंघाचे आमदार बालाजी कल्याणकर (Balaji Kalyankar) यांच्या गाडीची अज्ञातांकडून गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. बालाजी कल्याणकर हे शिंदे गटाचे आमदार आहेत. कल्याणकर हे अर्धापूर तालुक्यातील देगाव कुराडा येथे एका लग्नकार्यासाठी गेले होते, तेव्हा हा प्रकार घडला. या घटनेने नांदेडमध्ये खळबळ उडाली आहे.

दरम्यान, कल्याणकर यांची गाडी पार्किंग परिसरामध्ये उभी करण्यात आली होती. त्यावेळी काही अज्ञातांनी गाडीवर हल्ला केला आहे. कल्याणकर गाडीत नसताना हा हल्ला झाला त्यामुळे ते बचावले आहेत. मात्र या हल्ल्यात गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. या हल्ल्यात गाडीच्या मागील काचा पूर्णपणे तोडण्यात आल्या आहेत.

---Advertisement---
whatsapp link

हे ही वाचा :

मी पुन्हा आलो पण येताना दोन्ही पक्ष फोडूनच आलो देवेंद्र फडणवीस यांचे मोठे वक्तव्य

मोठे इव्हेंट करून विकास होत असल्याचा आभास – राहुल गांधी

धक्कादायक : पुण्यात दिवसाढवळ्या गोळीबार, एकाचा मृत्यू

कळपातून उधळलेला बैल थेट कारमध्येच घुसला; नंदुरबारमधील घटना

जुन्नर : मुलीच्या बालविवाह प्रकरणी आई-वडिल, नवरदेव, सासु-सासरे, भटजीसह 8 जणांवर गुन्हा

राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेची आज सांगता सभा

अधिसूचना ते मतमोजणी लोकसभा निवडणुकीचे संपुर्ण वेळापत्रक

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles