Monday, December 23, 2024
Homeग्रामीणशहीद महात्मा गांधी जयंतीदिनी आंबेगाव तालुक्यातील २० पेक्षा अधिक गावात जनतेचा सत्याग्रह

शहीद महात्मा गांधी जयंतीदिनी आंबेगाव तालुक्यातील २० पेक्षा अधिक गावात जनतेचा सत्याग्रह


आंबेगाव
 : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात शहीद महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी २० पेक्षा अधिक गावात जनतेने सत्याग्रह करत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्याची अमलबजावणीसाठी करण्याची मागणी केली, अशी माहिती अखिल भारतीय किसान सभेचे पुणे जिल्हा सचिव डॉ. अमोल वाघमारे यांनी सांगितले.

किसान सभेच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या सत्याग्रह आंदोलनात शेकडो श्रमिकांचा सहभाग होता. तसेच लोकांच्या हाताला गावातच कसे काम मिळेल, यासाठी ७ आक्टोबर पासून भिमाशंकर ते जिल्हाधिकारी कार्यालय पुणे असे १६० किलोमीटर किसान सभेचे शिष्टमंडळ पायी चालत जाऊन कोरोनाच्या काळात योग्य ती काळजी घेत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहे.

यावेळी जिल्हा परिषदेकडे ऐन लॉकडॉऊन काळात कामाची मागणी करूनही काम उपलब्ध झालेले नाही, अशा सर्व मजूरांना बेरोजगार भत्ता देण्यात यावे, किमान पाच मजूरप्रधान कामे आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागातील प्रत्येक ग्रामपंचायतच्या शेल्फवर ठेवावीत, प्रत्येक कुटुंबाला कोणतेही शुल्क न घेता जॉबकार्ड त्वरित मिळावे, जॉबकार्डचे नूतनीकरण त्वरित करून द्यावे, आंबेगाव तालुक्यातील रोजगार हमीच्या कामांचे सोशल ऑडिट करण्यात यावे, आंबेगाव तालुक्यातील ज्या गावात काम रोजगार हमीवर काम करून दोन – दोन महिने अजून पगार मिळाला नाही त्यांना त्यांच्या कामांची मजुरी तात्काळ अदा करण्यात यावी, सुमारे १६ गावात रोजगार हमीच्या कामाची मागणी मजुरांनी करूनही काम दिले गेले नाही, मजुरांची फसवणूक केली गेली, याला दोषी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय