नांदेड : मागील चार वर्षापासून श्री रेणुका देवी संस्थान माहूर गड येथे सीटू संलग्न नांदेड जिल्हा मजदूर युनियनची रितसर शाखा कार्यान्वित आहे. दोनपूर्वी २७ ते ३१ जानेवारी असे पाच दिवस संस्थानातील कर्मचाऱ्यांनी सत्याग्रह केला होता. तेव्हा संस्थानचे सचिव तथा सहाय्यक जिल्हाधिकारी किनवट अभिनव गोयल (भा.प्र.से.) यांनी सर्व मागण्या मान्य केल्याचे लेखी पत्र संघटनेचे अध्यक्ष कॉ.गंगाधर गायकवाड व स्थानिक समितीचे अध्यक्ष कॉ.श्रावण जाधव यांच्या नावाने दिलेले आहे.
सीटूचे जनरल सेक्रेटरी तथा मजदूर युनियनचे अध्यक्ष कॉ.गंगाधर गायकवाड व श्री रेणुका देवी स्थानचे स्थानिक अध्यक्ष श्रावण जाधव आणि सचिव अरुण घोडेकर यांच्या नेतृत्वाखाली दि. १० जानेवारी सकाळी दहा वाजता पासून माहूर गडावर रेणुका मातेच्या पायथ्याशी सुरू केला आहे.
हेही वाचा ! महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) विविध पदांच्या एकूण ५४७ जागा
सीटू कामगार कर्मचारी युनियनच्या वतीने बेमुद्दत बैठा सत्याग्रह सुरू करून संस्थानचे व पदसिद्ध विश्वस्तांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न सीटू च्या सभासद असलेल्या संस्थानच्या कर्मचाऱ्यांचा आहे. सकाळी दहा वाजता माता रेणुकेच्या पायथ्याशी पहिल्या पायरीची आरती युनियन च्या वतीने करण्यात आली. तेव्हा आरतीच्या वेळी विश्वस्त चंद्रकांत भोपी यांची प्रमुख उपस्थिती होती.
दि.१६ फेब्रुवारी २०२० रोजीच्या बैठकीत सर्व कर्मचाऱ्यांना पूर्व लक्षी प्रभावाने नियमित वेतन श्रेणीवर कायम स्वरूपी नियुक्ती पत्र देण्याचे मान्य केलेले आहे.तसेच दि.१६ फेब्रुवारी रोजी श्री रेणुका देवी येथील मुख्य कार्यालयात झालेल्या बैठकीत युनियन प्रतिनिधी म्हणून कॉ.गंगाधर गायकवाड यांना निमंत्रित करण्यात आले होते.
हेही वाचा ! आर्मी वेल्फेअर एज्युकेशन सोसायटी अंतर्गत शिक्षक पदांच्या ८७०० जागा
वेतन श्रेणी व कायम आदेश काढण्याच्या प्रक्रियेला थोडा वेळ लागेल व युनियनने श्री रेणुका देवी संस्थानाच्या व्यवस्थापनास सहकार्य करावे अशी सुचना संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हा सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दिपक ढोलकीया यांनी केली होती. तसेच दर तीन महिन्याला कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना घेऊन युनियन च्या प्रतिनिधीसह बैठक घेण्यात येईल असे तोंडी बोलून स्पष्ट केले होते. परंतु २२ मार्च २०२० रोजी पासून कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे व लॉक डाऊनची अंमलबजावणी सुरू झाल्याने तसेच संस्थानातील सर्व कर्मचाऱ्यांना कोराना काळात किनवट व माहूर येथील कोविड सेंटरवर सेवा पुरविण्याचे लेखी आदेश सचिवांनी दिल्यामुळे कायम वेतन श्रेणीचे आदेश प्राप्त होण्यास विलंब झाला आहे. अत्यंत तुटपुंज्या पगारावर मागील अनेक वर्षापासून चोख कर्तव्य बजावणा-या कर्मचाऱ्यांच्या राहिलेल्या मागण्या व सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वाप्रमाणे किमान वेतन देण्यात यावे, अशी मागणी आहे.
तसेच दिनांक ६ फेब्रुवारी २०२१ व दि.५ जून २०२१ रोजी विश्वस्त समितीच्या बैठकीतील मंजूर करण्यात आलेल्या ठरावाची अंमलबजावणी करून दि.१ फेब्रुवारी २०२१ पासून वेतन श्रेणीचा लाभ देण्यात यावा. तसेच रिक्त असलेले व्यवस्थापक व सुरक्षा अधिकारी यांची पदे तात्काळ भरण्यात यावेत. या प्रमुख मागण्यासह इतरही मागण्या करण्यात आल्या आहेत.
हेही वाचा ! BSNL चा खाजगी कंपन्यांना दे धक्का, स्वस्त प्लॅनमुळे ग्राहकांचा कल वाढला
दि.१० जानेवारी सकाळी १० वाजता पासून सुरू करण्यात आलेल्या बेमुद्दत सत्याग्रहात अनेक सामाजिक संघटनांनी पाठिंबा दर्शविला असून त्या मध्ये अ.भा.किसान सभा, राष्ट्रीय आदिवासी अधिकार मंच व स्टूडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया आदी संघटनांच्या पदाधिका-यांनी प्रत्यक्षात गडावर येऊन पाठिंबा दिला आहे.
सदरील सत्याग्रहामध्ये युनियन अध्यक्ष कॉ.गंगाधर गायकवाड, स्थानिक समिती अध्यक्ष श्रावण जाधव, सचिव अरुण घोडेकर, उपाध्यक्ष अरविंद राठोड, सहसचिव गजानन घूगे, आकाश वानखेडे, कोष्याध्यक्ष विनोद कदम यांच्या सह श्री रेणुका देवी संस्थानचे सर्व कर्मचारी सत्याग्रहात सहभागी आहेत.
हेही वाचा ! रयत शिक्षण संस्था यांच्या अस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६१६ जागा