Saturday, October 5, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडपिंपरी चिंचवड : एस. टी. कामगारांच्या लढ्याला आता इतर जन संघटना बळ...

पिंपरी चिंचवड : एस. टी. कामगारांच्या लढ्याला आता इतर जन संघटना बळ देणार

पिंपरी चिंचवड : दोन महिन्याहून अधिक काळ चालेल्या एस. टी. कामगार संपाला आता इतर जनसंघटना बळ देणार आहेत. एस .टी. वाचवा संघर्ष समितीच्या वतीने पिंपरी येथे शहरातील जन-संघटनांच्या प्रतिनिधींची 8 जानेवारी रोजी बैठक घेण्यात आली. त्यात हा निर्णय घेण्यात आला.

बैठकीला लोकजागर ग्रुप, ह्यूमन सक्सेस सोशल फौंडेशन, अखिल भारतीय काँग्रेस, आम आदमी पक्ष, डीवायएफआय, भारताचा क्रांतिकारी कामगार पक्ष, महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटना, क्रांतिकारी घरकामगार संघटना, लहूजी शक्ती सेना, रिपब्लिकन सेना, वंचित बहुजन आघाडी, मनसे, राष्ट्रीय श्रमिक आघाडी, श्रमिक एकता महासंघ या संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते व लोकजागर ग्रुपचे प्रमुख डॉ.सुरेश बेरी हे होते. बैठकीला एस.टी.कामगारही उपस्थित होते.

हेही वाचा ! आर्मी वेल्फेअर एज्युकेशन सोसायटी अंतर्गत शिक्षक पदांच्या ८७०० जागा

महाराष्ट्राच्या खेडोपाडी जाणारी एसटी वाचली पाहिजे. एस. टी. चे खासगीकरण झाले तर सर्वसामान्य जनतेचे खूप हाल होतील, असा सूर सर्वच प्रतिनिधींनी लावला होता. एस. टी. महामंडळाचे सरकारमध्ये विलीनीकरण झाले पाहिजे. एस. टी. चे खासगीकरण करण्याचा डाव हाणून पाडला पाहिजे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी सार्वजनिक वाहतूक बळकट झाली पाहिजे, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

रिपब्लिकन सेनेचे सूर्यकांत धावारे यांनी हा लढा आता एसटी डेपोसमोर च्या मांडवातून रस्त्यावर आला पाहिजे, असे उद्गार काढले.

हेही वाचा ! महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) विविध पदांच्या एकूण ५४७ जागा

राज्यातील महाविकास आघाडी सरकार असो नाही तर केंद्रातील मोदी सरकार असो, दोघांचेही धोरण कामगार विरोधी असून ते खासगीकरणाकडे झुकणारे आहे. त्यामुळे त्याला कडाडून विरोध केला पाहिजे, असे उद्गार वंचित बहुजन आघाडीचे शहर प्रवक्ता के.डी.वाघमारे यांनी काढले.

एस. टी. चे खासगीकरण झाले तर सर्वसामान्य जनतेचे हाल – बैठकीतील सूर

रास्ता रोकोसारखे आंदोलन केले तर आम्ही पूर्ण ताकदीनिशी या लढ्यात उतरू असे आश्वासन लहूजी शक्ती सेनेचे कार्यकर्ते तात्या सोनोने यांनी दिले.

यावेळी डीवायएफआयचे सचिन देसाई व स्वप्निल जेवळे, क्रांतीकारी कामगार पक्षाचे रविशंकर पुर्णे, आम आदमी पक्षाचे वैजनाथ शिरसाठ, काँग्रेसचे अॅड. मोहन अडसूळ यांनीही विविध सूचना केल्या. त्यात घरोघरी जाऊन मदत गोळा करणे, समर्थनार्थ सह्यांचा अर्ज, कोपरा सभा, समाज माध्यमांचा वापर, रस्त्यावर मानवी साखळी, पत्रकार परिषद यासारख्या सूचनांचा समावेश होता.

हेही वाचा ! BSNL चा खाजगी कंपन्यांना दे धक्का, स्वस्त प्लॅनमुळे ग्राहकांचा कल वाढला

यावेळी राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे धनंजय जाधव व संजय साळुंखे, श्रमिक एकता महासंघाचे मनोज पाटील, मनसेचे के.के.कांबळे, क्रांतिकारी कामगार पक्षाचे परमेश्वर जाधव, ह्यूमन सक्सेस सोशल फौंडेशनचे सुखानंद कांबळे हेही उपस्थित होते.

बैठकीचे अध्यक्ष डॉ.सुरेश बेरी बोलताना म्हणाले, हा लढा पुढे नेण्यासाठी सोमवारी प्रतिनिधींची बैठक होऊन त्यात आंदोलनाच्या स्वरूपाविषयी निर्णय घेण्यात येईल. त्यानंतर बुधवारी पत्रकार परिषद घेऊन त्यात आंदोलनाचा कार्यक्रम जाहीर करण्यात येईल, असे निवेदन केले. 

हेही वाचा ! रयत शिक्षण संस्था यांच्या अस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६१६ जागा

बैठक यशस्वी करण्यासाठी एस टी कामगार प्रतिनिधी प्रवीण मोहिते, भारत नाईक,ओमप्रकार गिरी, कोरे यांनी विशेष परिश्रम घेतले.


संबंधित लेख

लोकप्रिय