Thursday, December 12, 2024
Homeराजकारणकाँग्रेसचा मोठा निर्णय; राजस्थानच्या उपमुख्यमंत्री पदावरून सचिन पायलट यांना हटवले

काँग्रेसचा मोठा निर्णय; राजस्थानच्या उपमुख्यमंत्री पदावरून सचिन पायलट यांना हटवले

(जयपूर) :-  गेल्या काही दिवसांपासून राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गोहलत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातील वाद ऐरणीवर आला होता. त्यातूनच त्यांनी बंडाचे हत्या पुकारून आपल्याच सरकार समोर आव्हान उभे केले होते. अशातच आता काँग्रेसने मोठा निर्णय घेतला आहे. सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्रीपदावरुन हटवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

       काँग्रेसचे नेते रणदीप सिंह सूरजेवाला यांनी हा निर्णय जाहीर केला. आज जयपूरच्या फेअरमाँट हॉटेलमध्ये काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक पार पडली. त्या बैठकीला १०२ आमदार उपस्थित असून त्यांनी सचिन पायलट यांना पक्षातून काढण्याची मागणी केली असल्याची बातमी एएनआयने या वृत्त संस्थेने दिले आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय